IMPIMP

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!

by sachinsitapure
Raj Thackeray Meet CM Eknath Shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | मागील काही दिवसांपासून राज्य सरकारवर (State Govt) सातत्याने टीका करणारे मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट (Raj Thackeray Meet CM Eknath Shinde) घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ही भेट नेमकी कशासाठी होती, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी या भेटीत राज्यातील टोल नाके (Toll Plaza) आणि दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत (Marathi Name Plates ) चर्चा केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) देखील उपस्थित होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील टोल नाक्यांच्या प्रश्नावरून १२ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची
भेट घेतली होती. राज्यातील जनता रोड टॅक्स भरते, मग टोलचा भार कशाला, असा प्रश्न त्यावेळी राज ठाकरे त्यांनी मांडला होता.
तसेच यावेळी मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) आणि अधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे यांची बैठक झाली होती. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आजच्या भेटीत राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी टोल प्रश्न, मराठी पाट्या आणि
विविध विषयांवर चर्चा केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Related Posts