IMPIMP

Sharad Pawar | शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा शोध लागला; अजित पवारांची माहिती

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar the person who threatened ncp chief sharad pawar was found there is information that the accused is in out of state

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी
दिली होती. या व्यक्तीने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या अज्ञात
व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला होता. आता पोलिसांना तपासात यश आले असून, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध
लागला आहे.

 

या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. धमकी देणाऱ्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून, सदर व्यक्ती बाहेरील राज्यातील असल्याचे देखील अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती वेडसर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुंबईतील मलबार हिल परिसरात सिल्वर ओक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान आहे. याच सिल्वर ओकवर सदर व्यक्ती वारंवार फोन करत होता. आणि त्याने सुरक्षा रक्षकांना धमकी दिली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

धमकी देणाऱ्याने देशी कट्ट्याने शरद पवार यांना ठार मारू, असे म्हंटले होते. याप्रकरणी सिल्वर ओकवरील पोलीस ऑपरेटरने या धमकी संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात सदर व्यक्तीविरोधात भा. द. वि. 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar the person who threatened ncp chief sharad pawar was found there is information that the accused is in out of state

 

हे देखील वाचा :

Dhule News | मस्करी जीवावर बेतली; गुदद्वारात प्रेशर पंपाने हवा भरल्याने तरूणाचा मृत्यू

Murder In Miraj | मिरजमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत पैलवानाचा खून

Khandala Ghat Accident-Anda Point | सहलीसाठी आलेल्या बसचा अपघात होऊन 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू; खंडाळा घाटातील घटना

 

Related Posts