IMPIMP

Sharad Ponkshe | ‘हर हर महादेव’च्या समर्थनात शरद पोंक्षे म्हणले, ‘तुम्ही गुंड आहात का? हा शुद्ध हलकटपणा…’

by nagesh
Sharad Ponkshe | marathi actor sharad ponkshe on film har har mahadev ncp mns

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी ठाण्यातील एका मॉलमधील प्रयोग बंद पाडला होता. त्यावर शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी भाष्य केले आहे. सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) चित्रपटाला संमती दिली असताना त्याला विरोध का केला जात आहे?, असे शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हर हर महादेवच्या विरोधात संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade), राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसंग्राम (छत्रपती संभाजी महाराज) आदी लोक आणि पक्ष उभे टाकले आहेत. तर दुसरीकडे मनसे (MNS) या चित्रपटाच्या बाजूने उभी आहे. त्यामुळे यांच्यात या चित्रपटावरुन मोठे वाद पेटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, नाशिक, ठाणे अशा अनेक ठिकाणी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रयोग बंद पाडले आहेत. मनसे हे बंद पाडलेले प्रयोग पुन्हा सुरु करण्यास सांगत आहे. त्यात आता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी हर हर महादेव चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना सुनावले आहे. सेन्सॉर बोर्डाने संमती देऊनही चित्रपटाला विरोध का केला जात आहे, असे शरद पोंक्षे म्हणाले. तसेच यासंदर्भात आपण संभाजी महाराजांची भेट देखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

चित्रपटाला सेन्सॉर बोर्डोने परवानगी दिली आहे. तिथे हुशार माणसे नेमली आहेत.
कोणता प्रसंग इतिहासातील कोणत्या प्रसंगावर आधारीत आहे, याचे पुरावे दिग्दर्शकाने दिले आहेत.
प्रेक्षकांना मारुन चित्रपटगृहाच्या बाहेर काढले जात असल्याने हा हलकटपणा आहे, असे पोंक्षे म्हणाले.
तसेच विरोध करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसे ते चित्रपट बनविणाऱ्याला नाही का?
तुम्ही काय गुंड आहात का? आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेता, शाहू, फुले, आंबेडकर यांनी हेच शिकवले आहे
का?, असा संताप पोंक्षे यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Sharad Ponkshe | marathi actor sharad ponkshe on film har har mahadev ncp mns

 

हे देखील वाचा :

MNS | कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता …,मनसेचा संजय राऊतांना खोचक टोला

Sharad Pawar | भाजपने निवडलेल्या कुस्तीगीर परिषदेला मोठा झटका; शरद पवारांची परिषद भरवणार महाराष्ट्र केसरी आखाडा

Kirit Somaiya | अनिल परबांना न्यायालयात हजर राहून हिशोब द्यावा लागणार – किरीट सोमय्या

 

Related Posts