IMPIMP

Shashi Tharoor | शिवसेनेच्या खा. प्रियंका चतुर्वेदींनंतर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही राजीनामा; सोडला TV शो

by nagesh
Shashi Tharoor | Congress MP shashi tharoor steps down host sansad tv show solidarity suspended mps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Shashi Tharoor | मागील आठवड्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्या दरम्यान राज्यसभेच्या बारा खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे. यानंतर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांनी सांसद टीव्हीचा राजीनामा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांच्याकडे दिला. यानंतर आता काँग्रेस खासदार (Congress MP) शशी थरुर (Shashi Tharoor) यांनीही सांसद टीव्हीचा कार्यक्रमाला राजीनामा (Resigned) दिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

शशी थरुर (Shashi Tharoor) म्हणाले की, ‘एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी संसद टीव्हीचं निमंत्रण स्वीकारणं लोकशाहीच्या सर्वोत्तम परंपरांपैकी एक होतं. आमच्यामध्ये राजकीय मतभेद असले तरीही संसदेचे सदस्य म्हणून विविध संसदीय संस्थांमध्ये सहभागी होण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही हेच यातून दिसलं. निलंबित खासदार करत असलेल्या आंदोलनाला पाठिबा म्हणून टू द पॉईंट कार्यक्रम सोडत आहे. तर, खासदारांचं निलंबन मागे घेतल्यास कार्यक्रमात पुन्हा सहभागी होईन. जोपर्यंत निलंबन रद्द होत नाही, तोपर्यंत कार्यक्रम करणार नाही, असं थरुर म्हणाले.

 

 

तसेच, जोपर्यंत 12 खासदारांचं निलंबन मागे घेतलं जात नाही, तोपर्यंत शो होस्ट करणार नाही,
अशी भूमिका शशी थरुर यांनी घेतली आहे. दरम्यान, याआधी प्रियंका चतुर्वेदी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आहे. चतुर्वेदी सांसद टीव्हीच्या अँकर आहेत. राज्यसभेतून निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी अँकरपदाचा राजीनामा दिला.

 

Web Title :- Shashi Tharoor | Congress MP shashi tharoor steps down host sansad tv show solidarity suspended mps

 

हे देखील वाचा :

Maharashtra Temperature | राज्यात रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता, तापमानात घट

Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडेंनी आरोप फेटाळले, म्हणाले – ‘परमबीर सिंह यांनी प्रकरण संपवण्यासाठी…’

 

Related Posts