IMPIMP

400 कोटींचा घोटाळा ! शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना अखेर रद्द

by nagesh
shivajirao bhosale cooperative banks license cancelled

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – चारशे कोटींचा घोटाळा करणाऱ्या शिवाजीराव भोसले (Shivajirao Bhosale) सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने नुकताच आदेश दिला आहे. दरम्यान, या आदेशामुळे ठेवीदारांना बँक विमा महामंडळामार्फत प्रत्येकी किमान ५ लाख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या’ ! छत्रपती संभाजी राजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

शिवाजीराव भोसले Shivajirao Bhosale सहकारी बँकेचे २०१८-१९ वर्षाचे ऑडिट करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता, त्यात ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळले. त्यामुळे आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप, हनुमान सोरते यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत गेली. त्यानंतर मुख्य आरोपी आमदार अनिल भोसलेसह सर्वाना अटकही झाली आहे. एवढ्यावरच न थांबता अनिल भोसलेंच्या तीन गाड्याही जप्त करण्यात आल्या होत्या. या सर्वांच्या बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. बँकेच्या एकूण १४ शाखा असून, ९५ हजार खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत १२ कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे.

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, जाणून घ्या आजचे दर

दरम्यान ठेवीदारांनी ठेवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. वेळप्रसंगी ठेवीदारांनी आंदोलनेही केली. आता मात्र रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले Shivajirao Bhosale सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे बँक विमा महामंडळामार्फत प्रत्येकी किमान ५ लाख मिळण्याचा ठेवीदारांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Also Read:- 

वजन नक्की कमी होईल, फक्त सकाळी उठल्यानंतर ‘हे’ काम करा, जाणून घ्या

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईलa वेगाने घट

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली…

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’ ! लसीकरणावरून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी?

किरीट सोमय्यां(Kirit Somaiya)नी महाविकास आघाडी सरकारला डिवचले, म्हणाले…

Maratha Reservation : 3 पक्षांमध्ये मतभेद, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध; गिरीश महाजनांची टीका

Related Posts