IMPIMP

Shivsena Leader Abdul Sattar | शिवसेना नेत्याचं मोठं विधान; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अमरावतीत जाऊन…’

by nagesh
Shivsena Leader Abdul Sattar | if uddhav thackeray gives orders i will contest election against navneet rana in amravati says abdul sattar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena Leader Abdul Sattar | मागील अनेक दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि राणा दाम्पत्य (Rana Couple) यांच्यात जोरदार राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसत आहे. अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूकीमध्ये (BMC Municipal Election) शिवसेनेविरोधात प्रचार करणार असल्याचं भाष्य केले आहे. राणा यांच्या या विधानानंतर शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Shivsena Leader Abdul Sattar) यांनीही मोठं विधान केलं आहे. त्यावेळी ते बीडमध्ये (Beed) माध्यमांशी बोलत होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवेल,” असं थेट आव्हान अब्दुल सत्तार (Shivsena Leader Abdul Sattar) यांनी दिले आहे. त्याचबरोबर, ”राणा दाम्पत्य भाजपाची (BJP) सुपारी घेऊन बोलत आहेत, त्याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ,” असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.

 

दरम्यान, ”नारायण राणे हे चार आणेसारखी गोष्ट करतात. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे बोलले ते त्यांनी केले. त्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशात नाव आहे.
काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात,”
असं म्हणत सत्तार यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.

 

Web Title :- Shivsena Leader Abdul Sattar | if uddhav thackeray gives orders i will contest election against navneet rana in amravati says abdul sattar

 

हे देखील वाचा :

Pune Mandai Traffic Jam | मेट्रोच्या कामामुळे मंडईतील वाहतूक कोंडी श्वास कोंडणारी ! वाहतूक पोलीस, मेट्रो आणि अतिक्रमण विभागाने सोडले पुणेकरांना वाऱ्यावर

Weight Loss Tips | पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी पडतील ‘हे’ 7 आयुर्वेदिक उपाय; जाणून घ्या

Ajit Pawar | ‘तिकीट देण्याचा अधिकार संजय राऊतांना की उद्धव ठाकरेंना’, ‘त्या’ विधानावरुन अजित पवारांचा थेट सवाल

 

Related Posts