IMPIMP

Sitaram Kunte | ईडी चौकशीदरम्यान माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, म्हणाले -‘अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची…’

by nagesh
Sitaram Kunte | serious allegations of ex chief secretary sitaram kunte on anil deshmukh about police transfer

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमाजी मुख्य सचिव (Former Chief Secretary) सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडी (ED) चौकशी दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप (Allegations) केले आहेत. सीताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary) असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची (Police Officers Transfer) अनधिकृत यादी (Unauthorized List) पाठवत असल्याचा मोठा आरोप कुंटे यांनी केला आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) तपास करत असताना मागील वर्षी 7 डिसेंबर रोजी सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांचा जबाब नोंदवला होता. यामध्ये कुंटे यांनी पोलीस विभागाच्या बदलीबाबत ही माहिती दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख गृहमंत्री असताना विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा विशिष्ट पदांवरील बदल्यांची एक अनधिकृत यादी पाठवत होते. ते आपले खासगी सचिव संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांच्यामार्फत ही यादी पाठवायचे. ही यादी मला माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळायची. मी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात काम करत असल्याने मी या यादीला नकार देऊ शकत नव्हतो.

 

बोर्डाच्या सदस्यांना तोंडी सांगितलं जायचं
अनिल देशमुख यांनी पाठवलेली अनधिकृत बदलीची यादी पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या (Police Establishment Board) सर्व सदस्यांना दाखवली जायची.
या सर्व सदस्यांना यादी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठवल्याचं तोंडी सांगितलं जायचं.
यानंतर ही यादी अंतिम आदेशात समाविष्ट केली जात होती असेही कुंटे यांनी सांगितले.

 

काय आहे प्रकरण ?
अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai CP Parambir Singh) आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (API Sachin Vaze) यांनी 100 कोटी खंडणी (100 Crore Ransom) गोळा करण्यास सांगितल्याचे आरोप केले.
हे प्रकरण न्यायालयात (Court) गेल्यानंतर कोर्टाने या प्रकरणात गुन्हा (FIR) दाखल करुन सीबीआय (CBI) चौकशीचे आदेश दिले.
सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई करण्यास सुरुवात केली.
अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पैसे हवालामार्फत दिल्लीला पाठवले जायचे
ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्टा बार (Mumbai Orchestra Bar) मालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिले.
जे नंतर नागपूरला (Nagpur) गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला हे पैसे सोपवले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, त्यांच्या तपासात असे समोर आले की, हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्ली येथील सुरेंद्र कुमार जैन (Surendra Kumar Jain) आणि वीरेंद्र जैन (Virendra Jain) यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते.
जैन बंधूंनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट (Sri Sai Educational Institute) या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

 

Web Title :- Sitaram Kunte | serious allegations of ex chief secretary sitaram kunte on anil deshmukh about police transfer

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | धक्कादायक ! शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

Exercise During Period | पीरियड्समध्ये वर्कआऊट करणे योग्य की चुकीचे? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Pune News | फ्लॅटधारकास मिळणार पार्किंगचा ताबा

Pune Crime | छेडछाडीची तक्रार केल्याचा राग ! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डोक्यात घातला हातोडा, परिसरात खळबळ

 

Related Posts