IMPIMP

South Superstar Vijay | साऊथ सुपरस्टार विजयला बॉम्बनं घर उडवण्याची धमकी

by nagesh
South Superstar Vijay | south superstar vijay recieves theat read details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन South Superstar Vijay | ‘मास्टर’ फेम अभिनेता विजय (Vijay) याला बॉम्बनं घर उडवण्याची धमकी (Threat) देण्यात आली आहे. सोमवारी पहाटे तामिळनाडू राज्य पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला (Tamil Nadu State Police Chief Control Room) एक कॉल आला होता. ज्यामध्ये चेन्नईतील विजयच्या (South Superstar Vijay) निवासस्थानी बॉम्ब (Bomb) ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. याची माहिती मिळताच पोलिस मुख्यालयाने तात्काळ अधिकारी आणि काही धाडसी पोलिसांचे पथक, स्निफर डॉग आणि बॉम्ब निकामी पथकासह विजयच्या निलाकर्णई या निवासस्थानी पोहोचले. यानंतर विजयच्या घराची बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने झडती घेतली असता ही धमकी अफवा (Rumors) असल्याचे समजले. यानंतर तामिळनाडू पोलिसांनी आलेल्या कॉलच्या आधारे शोध घेऊन धमकी देणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

या धमकी देणाऱ्या आरोपी व्यक्तीचे नाव एस भुवनेश्वरन (S. Bhubaneswaran) असे आहे. विजयच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने याअगोदर मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, विरोधी पक्षनेते एडप्पाडी के. पलानीस्वामी आणि अभिनेते रजनीकांत, कमल हासन, अजित कुमार यांना असाच धमकीचा फोन केला होता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गेल्या वर्षीसुद्धा विजयच्या (South Superstar Vijay) सालीग्रामम येथील घरावर आणि अभिनेता अजितच्या चेन्नईच्या इंजामबक्कम येथील घरी बॉम्बच्या बनावट धमक्या आल्या होत्या. मोठ्या व्यक्तींना फेक कॉलद्वारे धमक्या देणारा एस भुवनेश्वरन हा मानसिकदृष्ट्या अस्थिर (Mentally unstable) असल्याचे समजत आहे. थालपथी विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या नेल्सन दिलीप कुमारच्या (Nelson Dilip Kumar) बीस्टमध्ये काम करत आहे. जो एप्रिल 2022मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे (Pooja Hegde) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- South Superstar Vijay | south superstar vijay recieves theat read details

 

हे देखील वाचा :

IND Vs NZ | विल्यमसननंतर न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू टी- 20 सीरीजमधून बाहेर

Katrina Kaif | …म्हणून कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नात नसणार सलमान खान

ICC च्या ‘या’ निर्णयामुळे BCCI ला मोठा दिलासा, 1500 कोटींची होणार बचत

 

Related Posts