IMPIMP

ST Bus News | एसटीच्या भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत, आजपासून नवे नियम लागू

by nagesh
ST Bus News | 50 percent discount on st fare for women from today new rules apply

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना (Half Ticket For Women In ST Bus) प्रवास तिकिट दरात 50 टक्के (ST Ticket Fare) सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते. अखेर आजपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. आजपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये महिलांना 50 टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे. यापार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून (ST Bus News) एक परिपत्रक काढून या योजनेची माहिती देण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हटलंय परिपत्रकात?

महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या (ST Bus News) सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत (50 Percent Discount) देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या (State Transport Corporation) स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.

 

समाजातील वेगवेगळ्या घटकांना फायदा

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सामाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के
पर्य़ंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवानिमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. सदर सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होते, असे या पत्राकामध्ये म्हटलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- ST Bus News | 50 percent discount on st fare for women from today new rules apply

 

हे देखील वाचा :

Sanjay Kakade – DHLF Bank Loan | माजी खासदार संजय काकडेंना उच्च न्यायालयाचा दणका, बँकांचं कर्ज थकल्याने संपत्ती जप्त करण्याचे आदेश

Journalist Shashikant Warishe Murder Case | पत्रकार शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक हत्या, विधानपरिषदेत सरकारची कबुली

Unseasonal Rain In Maharashtra | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Related Posts