IMPIMP

Sujay Vikhe Patil-Ajit Pawar | ‘सुजय विखे अजित पवारांच्या कानात असं काय बोलले की पवारांनी…’; नगरमधील ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

by nagesh
Sujay Vikhe Patil-Ajit Pawar | discussion between ajit pawar and bjp mp sujay vikhe patil in the program at shirdi police station

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Sujay Vikhe Patil-Ajit Pawar | भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे – पाटील (Sujay Vikhe-Patil) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. विखे आणि पवार या दोन्ही कुटंबातील वाद महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. दोन्ही कुटुंब एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. मात्र अशातच सुजय विखे – पाटील आणि अजित पवार एका मंचावर असून विखे पवारांच्या कानामध्ये काहीतरी सांगत असल्याचं दिसत आहे. (Sujay Vikhe Patil-Ajit Pawar)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिर्डीतील पोलीस (Shirdi Police Station) स्टेशनचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हा प्रसंग घडला. सुजय विखे – पाटलांना अजित पवारांसोबत बोलायचं असल्याने ते मागे वाटत पाहत बसले होते त्यानंतर ते उठले आणि अजित पवारांना कानात काहीतरी सांगितलं. त्यावेळी अजित पवार हात जोडताना दिसत आहेत. (Sujay Vikhe Patil-Ajit Pawar)

 

 

अजित पवार आणि विखेंमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.
त्यासोबतच त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्यातील हितगुज हा चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्त्वाचं म्हणजे दोन दिवसांपुर्वी सुजय विखे – पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.

 

दरम्यान, आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही पलटी मारू शकतो, असं सुजय विखे – पाटील म्हणाले होते.
त्यामुळे नगरमधील राजकारणात काही नवीन ट्विस्ट येतो का काय ?, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Sujay Vikhe Patil-Ajit Pawar | discussion between ajit pawar and bjp mp sujay vikhe patil in the program at shirdi police station

 

हे देखील वाचा :

Accident On Pune Solapur Highway | खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात टँकर व दुचाकीचा अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

Ajit Pawar On Raj Thackeray | ‘अरे बाबा, भोंग्यावर भाषणं करणं सोपं आहे, पण..’ – अजित पवार

Nia Sharma Killer Look | निया शर्मानं पायऱ्यांवर बसून दिल्या किलर पोज; नेटकरी म्हणाले – ‘कपड्यांपेक्षा शूज मोठे झालेत..’

 

Related Posts