IMPIMP

Supreme Court On Husband Property | सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा ! मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क किती?

by nagesh
Maharashtra Local Body Election | postponement of local self government elections the hearing will be held in three weeks

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Supreme Court On Husband Property | एका पन्नास वर्षीय जुन्या खटल्यावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी दिला आहे. पतीच्या संपत्तीवर पत्नीचा किती हक्क असतो. याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्वाळा केला आहे. ‘स्वत: कमाविलेल्या संपत्तीचा मालक जर हिंदू पुरुष असेल आणि जर त्याने मृत्यूपत्राद्वारे ती संपत्ती पत्नीला दिली असेल तर ती त्या संपत्तीचा पूर्ण मालक होत नाही. हे पतीने पत्नीचा मृत्यू (Died) पश्चात खर्च भागण्यासाठी योग्य तरतूद केली तर पत्नीचा मृत्यूपत्राद्वारे दिलेल्या संपत्तीवर पूर्ण हक्क राहत नाही, असं म्हटलं आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल (Justice Sanjay Kishan Kaul) आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश (Justice MM Sundaresh) यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. (Supreme Court On Husband Property)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हरियाणाच्या (Haryana) जुंडला गावचे रहिवासी असलेले तुलसी राम (Tulsi Ram) यांनी 15 एप्रिल 1968 साली मृत्यूपत्र केले होते. पुढील वर्षी 17 नोव्हेंबर 1969 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपत्रात त्यांनी त्यांची अचल संपत्ती 2 भागात वाटली होती. एक भाग पहिल्या पत्नीचा मुलगा आणि दुसरा भाग दुसऱ्या पत्नीच्या नावे केला होता. दरम्यान, या वाटणीमध्येही दुजाभाव होता. तुलसी राम यांनी मुलाच्या नावे निम्मी संपत्ती पूर्ण मालकी हक्काने दिली होती. पण, पत्नीला तिचे भरण पोषण होईल एवढी आणि या उद्देशाने सीमित संपत्ती दिली होती. (Supreme Court On Husband Property)

 

त्याचबरोबर दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर या संपत्तीवर मुलाचा हक्क येईल असं सांगितलं होतं.
राम देवीने (Ram Devi) ही संपत्ती विकली होती, यावर मुलाने दावा दाखल केला होता.
तर, या कारणामुळे राम देवीकडून संपत्ती विकत घेणाऱ्यांचा या संपत्तीवर कोणताही हक्क उरत नाही.
त्यांच्या बाजुने खरेदीखत कायम केले जाऊ शकत नाही.
राम देवीला सीमित मृत्यूपत्राच्या माध्यमातून मिळालेली संपत्ती विकण्याचा हक्क नव्हता, अथवा ती दुसऱ्याच्या नावे हस्तांतर करू शकत नव्हती. असे न्यायालयाने म्हटलं आहे.
तसेच, पंजाब आणि हरियाणाच्या हाय कोर्टाचा (Punjab And Haryana High Court) निर्णयही रद्द केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Supreme Court On Husband Property | suprem court on husband property what is wifes right over husbands property through will an important decision of the SC

 

हे देखील वाचा :

Gajanan Babar Passes Away | पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची पहिली शाखा सुरु करणारे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन; 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nitesh Rane | भाजपचे आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

Raj Thackeray | युतीबाबत राज ठाकरेंनी केलं महत्वाचं विधान, पदाधिकार्‍यांना म्हणाले…

Pune Crime | मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts