IMPIMP

Sushma Andhare | बंगल्यांच्या चौकशीबाबत बोलायचं असेल तर किरीटभाऊंनी आधी मुख्यमंत्र्यांकडे पहावं – सुषमा अंधारे

by nagesh
Sushma Andhare | sushma andhare replied to kirit somaiya after allegation on rashmi uddhav thackeray banglow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – भाजपनेते किरीट सोमय्या यांनी काल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंविरोधात चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी किरीट सोमय्या यांना एक सल्ला दिला आहे. (Sushma Andhare)

 

किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंचे कोलई येथे १९ बंगले होते पण आता ते गायब झालेत याबाबत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, ‘किरीट सोमय्या जे काम करतात, ते प्रशंसेस पात्र असतं. फक्त ते आरंभशूर फार आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दलची तक्रार आहे. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
तसेच, याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ते चौकशी करतात, पण त्याचे पुढे काहीच होत नाही.
आता राहिला प्रश्न १९ बंगल्यांचा जर किरीट भाऊंचा टेस्ट बदलला असेल आणि त्यांना बंगल्यांची चौकशी
करण्याचा मूड झाला असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? याचेही उत्तर दिले पाहिजे. असे प्रतिउत्तर सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांना दिले आहे. सह्याद्री, नंदनवन, रामटेक, वर्षा आणि शेजारचे दोन-तीन हे बंगले मुख्यमंत्र्यांचेच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती बंगले स्वतः कडे ठेवावेत, याची काही नियमावली आहे का? याबाबतची अधिक माहिती घेऊन किरीटभाऊंनी आपल्या ज्ञानात भर पाडावी असा टोला देखील सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना किरीट सोमय्यांना लगावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) नाशिक दुर्घटनेवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.
‘या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली आहे, ते ठीक आहे.
मात्र आगीच्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत.
त्यासाठी लागणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाबाबत सरकार गंभीर नसल्याचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित
केला आहे. तसेच महिला व बालकल्याण खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नसण्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Sushma Andhare | sushma andhare replied to kirit somaiya after allegation on rashmi uddhav thackeray banglow

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे हाजिर हो!, ‘या’ तारखेला राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार, काय आहे प्रकरण?

Pune Crime | पाण्याच्या हौदात पडून २ वर्षाच्या मुलीचा मृत्यु; सिमेंट पाईप बनविणार्‍या कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

 

Related Posts