IMPIMP

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर संघात करणार ‘हा’ एक बदल

by nagesh
T20 World Cup | india vs england semi final rohit sharma could make one change

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा (India) सामना इंग्लंडविरुद्ध (England) होणार आहे. गुरूवार 10 नोव्हेंबर रोजी हा सामना पार पडणार आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येणार आहे. (T20 World Cup)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टीम इंडियामध्ये बदल?
झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) सामन्यात भारताने टीममध्ये एक बदल केला होता. या सामन्यात फॉर्ममध्ये नसलेल्या दिनेश कार्तिकऐवजी (Dinesh Kartik) ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी देण्यात आली होती. टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) एक मॅच वगळता सगळ्या सामन्यांमध्ये खेळला पण त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. तसंच इंग्लंडच्या टीममध्ये डावखुरे बॅटर जास्त असल्यामुळे ते डावखुऱ्या स्पिनरचा सहज सामना करू शकतात त्यामुळे पुढील सामन्यात डच्चू दिला जाऊ शकतो. (T20 World Cup)

 

 

अक्षर पटेलच्या जागी कोणाला संधी?
अक्षर पटेलला वगळलं तर रोहितकडे दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ते तीन पर्याय शिल्लक आहेत. यापैकी हुड्डा किंवा हर्षल पटेल यापैकी एका संधी मिळू शकते. सेमी फायनलमध्ये हुड्डाची निवड केली तर रोहितकडे बॉलिंगसाठी 5 पर्यायच शिल्लक राहतात. दुसरीकडे हर्षल पटेलही खालच्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो, तसंच तो फास्ट बॉलरही आहे, त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Web Title :- T20 World Cup | india vs england semi final rohit sharma could make one change

 

हे देखील वाचा :

Kantara | रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही ‘कांतारा’ची दमदार कमाई ; मोडले सर्व रेकॉर्डस्

T20 World Cup | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर, ‘या’ दोनपैकी एका टीमशी होणार भारताचा सामना?

Uddhav Thackeray | ‘बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारका’त शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री असतील, पण…, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला (व्हिडिओ)

T20 World Cup 2022 | ‘विराटला बाद करण्यासाठी…..!’, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार क्रेग एर्विनचे मोठे वक्तव्य

 

Related Posts