IMPIMP

TET Exam Scam | टीईटी पेपर गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांकडून दोन शासकीय कर्मचाऱ्यांना अटक

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनटीईटी पेपर गैरव्यवहारात (TET Exam Scam) दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी पेपर गैरव्यवहार मध्ये (TET Exam Scam) जी ए सॉफ्टवेअरचा (GA Software) संचालक डॉ. प्रीतीश देशमुख (Dr. Pritish Deshmukh) याच्याबरोबर अटक
करण्यात आलेल्या दोघा मुख्य एजंटांना 350 परीक्षार्थींचे 3 कोटी 85 लाख रुपये देणाऱ्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांना (Government Employee)
सायबर पोलिसांनी (Cyber Police) नाशिकमधून (Nashik) अटक केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टीईटी पेपर गैरव्यवहार प्रकरणात 12 जणांना अटक केली असून तब्बल 4 कोटी 68 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सुरंजित गुलाब पाटील Suranjit Gulab Patil (वय-50 रा. उत्तमनगर, नाशिक), स्वप्नील तीरसिंग पाटील Swapnil Tirsingh Patil (रा. शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव-Jalgaon) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

सरकारी वकील विजयसिंह जाधव (Government Advocate Vijay Singh Jadhav) यांनी न्यायालयात सांगितले की, स्वप्नील पाटील हा शिक्षक (Teacher) असून सुरंजित पाटील टेक्निशियन (Technician) आहे. त्यांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET Exam Scam) अंकुश हरकळ (Ankush Harkal) व संतोष हरकळ (Santosh Harkal) यांच्याशी संपर्क केला. त्यांनी 2018 आणि 2019 परीक्षेसाठी बसलेल्या परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी कट रचला. सुरंजित पाटील याने 2019 च्या परीक्षेसाठी 200 परीक्षार्थीकडून प्रत्येकी 1 लाख 10 हजार रुपये घेऊन या परीक्षार्थीची यादी व 2 कोटी 35 लाख रुपये अंकुश आणि संतोष हरकळ यांना वेळोवेळी दिल्याची कबुली दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

150 परीक्षार्थींकडून प्रत्येकी 1.10 लाख

स्पप्नील पाटील याने 2019 च्या परीक्षेला बसलेल्या 150 परीक्षार्थींकडून प्रत्येकी 1 लाख 10 हजार रुपये घेऊन त्यांची यादी व 1 कोटी 50 लाख रुपये अंकुश आणि संतोष हरकरळ यांना दिली. त्यांना या परीक्षा गैरव्यवहारत किती रक्कम मिळाली याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील जाधव यांनी न्यायालयात सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke),
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule),
पोलीस निरीक्षक डी.एस. हाके (Police Inspector D.S. Hake)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, अनिल डफळ, सचिन वाजे, नितेश शेलार, रवींद्र साळवे, नितीन चांदणे,सोनुने, अश्विन कुमकर यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देशमुखने 2 ते 3 वेळा बदलला निकाल

डॉ. प्रीतीश देशमुख याने अंकुश व संतोष हरकळ यांच्याकडून परीक्षार्थींची जमवाजमव करु त्यांच्याकडून पैसे घेतले. अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी शिक्षण परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर 2 ते 3 वेळा बनावट निकाल प्रकाशित केला.

 

 

 

Web Title :  TET Exam Scam | tet exam scam pune police arrested two government employees from nashik in this case

 

हे देखील वाचा :

How To Control Hypertension | हिवाळ्यात ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी डाएटमध्ये आहारात समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

Jammu And Kashmir Encounter | जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलांनी केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा

NEET-PG OBC Reservations | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ! वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी; EWS 10 टक्के आरक्षणालाही ग्रीन सिग्नल

 

Related Posts