IMPIMP

TET Exam Scam | टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत

by sachinsitapure
gold

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील (Teachers Eligibility Test (TET) Scam) अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेले एक कोटी रुपयांचे दागिने परत करण्याचा आदेश न्यायालयाने (Pune Court) दिला आहे.

टीईटी प्रकरणात जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्विनकुमार याच्या बंगळुरु येथील घरातून सुमारे २४ किलो चांदी, दोन किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आले होते. त्याचे दागिने काही अटीवर परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.(TET Exam Scam)

पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) टीईटी परीक्षा घोटाळ्यात अश्विनकुमार याला २० डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती. यावेळी त्याच्या बंगळुरु येथील घरातून मोठ्या प्रमाणावर ऐवज जप्त केला होता. तसेच तत्त्कालीन शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे (IAS Tukaram Supe) याच्याकडेही तब्बल पावणे चार कोटींची रोख रक्कम व ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अश्विनकुमार याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले असून खटला दोषारोप पत्र निश्चितीसाठी प्रलंबित आहे.

अश्विनकुमार याच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड. अक्षय शिंदे, अ‍ॅड. हर्षवर्धन पवार यांनी सायबर पोलिसांनी जप्त
केलेले जवळपास एक कोटी रुपयांचे सोने चांदी व हिर्‍यांचे दागिने आरोपीला परत मिळावेत, असा अर्ज केला होता.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी अश्विनकुमार यांचा अर्ज मंजूर केला.
२० लाख रुपयांचे बंधपत्रावर व खटल्याचा निकाल लागेपर्यंत सर्व दागिने न विकण्याच्या अटीवर जप्त केलेले सर्व दागिने
परत करण्याचा आदेश दिला आहे.

Related Posts