IMPIMP

Heart Attack | लग्न-उत्सवांमध्ये वाढताहेत ‘हार्ट अटॅक – कार्डियाक अरेस्ट’ची प्रकरणे; तज्ज्ञांनी सांगितली याची मुख्य कारणे

by nagesh
Heart Attack | why do people have heart attacks when dancing know all about its risk factors

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम – काही दिवसांपूर्वी लखनौमधील लग्नसोहळा अचानक शोकाकुल वातावरणात बदलला. लग्नाच्या एका कार्यक्रमादरम्यान अचानक नववधू स्टेजवर पडली, त्यातच तिचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालात असे सांगितले जात आहे की, वधूला हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला होता, ती गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. अलीकडच्या काही महिन्यांत लग्नसमारंभ आणि पार्टीमध्ये हार्ट अटॅक (Heart Attack) आणि कार्डियाक अरेस्ट तसेच त्यामुळे मृत्यूचा धोका वाढल्याचे दिसून आले आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये डान्स करताना एका ४० वर्षीय व्यक्तीचा अचानक कोसळून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. डॉक्टरांनी अशा धोक्यांबद्दल लोकांना सतर्क केले आहे. अशा वाढत्या समस्यांमागे कोणती कारणे असू शकतात आणि ती टाळण्यासाठी काय केले पाहिजे हे जाणून घेऊया?

 

हृदयविकाराचा वाढता धोका टाळण्याचे मार्ग

मोठ्या आवाजाचा हृदयावर होणारा परिणाम
ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. अन्वर. एम खान सांगतात की, डीजेचा मोठा आवाज (हृदयावरील दाब वाढवणारा) अशा प्रकारची प्रकरणे वाढण्यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहेत. मोठ्या आवाजामुळे सिंपॅथिक नर्व्हस सिस्टमचे नुकसान होते, ज्यामुळे हृदय गती वाढण्याचा धोका असतो. या स्थितीमुळे हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आणि कार्डियाक अरेस्ट यांसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, कोरोना संसर्गामुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, ज्यामुळे हृदयाची क्षमता कमकुवत झाली आहे.

 

कोरोनाने वाढवल्या हृदयाच्या समस्या
अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोरोनामुळे अनेक स्तरांवर हृदयाच्या समस्याही वाढल्या आहेत. संशोधकांना आढळले की, कोरोना व्हायरस संसर्ग शिरा आणि धमन्यांच्या आतील पृष्ठभागावरदेखील परिणाम करतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते. लहान वाहिन्यांना नुकसान होण्यासोबतच रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्टचा धोकाही वाढत आहे. ज्या लोकांना संसर्ग झाला आहे त्यांना जास्त धोका आहे. आरोग्य तज्ज्ञ हृदयविकारासह कोविडच्या धोक्यांबद्दल सर्वांना सतर्क करत आहेत.

 

हार्ट अटॅकच्या स्थितीत प्रथमोपचार आवश्यक
डॉक्टर अन्वर सांगतात, रुग्णाला वेळीच योग्य तो उपचार मिळाला, तर हृदयविकाराचा झटका येऊनही त्याचा जीव वाचू शकतो. अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास, कार्डियो पल्मोनरी रिसिटेशन (सीपीआर) दिल्यास अशा लोकांचे प्राण वाचू शकतात. सीपीआरमध्ये रुग्णाची छाती दोन्ही हातांनी दाबल्याने त्याला श्वास घेण्यास मदत होते. सीपीआरच्या मदतीने रुग्णाचा श्वास तपासा आणि त्याला श्वास द्या, असे केल्याने जीव वाचू शकतो. याची माहिती प्रत्येकाला मिळायला हवी.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्याप्रकारे हृदयाशी संबंधित प्राणघातक स्थितीची प्रकरणे वेगाने वाढली आहेत,
ते पाहता सर्व लोकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला अलीकडेच संसर्ग झाला असेल तर खबरदारी म्हणून डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमचे हृदय तपासा.
याशिवाय जोखीम टाळण्यासाठी, सण-उत्सवात मोठ्या आवाजापासून दूर राहा,
कारण यामुळे हृदय गती वाढण्याचा धोका संभवतो. निरोगी व्यक्तींनीही त्यांच्या हृदयाची तपासणी करून घेतली पाहिजे,
तसेच निरोगी राहण्यासाठी उपाययोजना करत राहणे अत्यंत आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Heart Attack | why do people have heart attacks when dancing know all about its risk factors

 

हे देखील वाचा :

Winter Hair Care | हिवाळ्यात केसांची घ्या चांगली काळजी, डँड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी ५ घरगुती उपाय

Ajit Pawar | अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

Gram Panchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीत दीपक केसरकरांना ठाकरे गटाचा दणका

 

Related Posts