IMPIMP

Thane ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Demand Case | Anti-Corruption News: ACB files case against Assistant Police Inspector Vivek Ashok Pawar in bribery case of 25 thousand

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी 80 हजार रुपये लाचेची मागणी करून 35 हजार रुपयांची लाच घेताना मुंब्रा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) रंगेहात पकडले. रमेश गंगाराम लाहीगुडे (वय 52) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या एपीआयचे नाव आहे. ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.5) सकाळी 11 वाजता केली. पोलीस ठाण्यातील या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 40 वर्षांच्या व्यक्तीने ठाणे एसीबीकडे 1 डिसेंबर रोजी तक्रार केली. तक्रारदार यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात आयपीसी 498A ,323, 504, हुंडाबंदी अधिनियम कलम 4 नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कलम 376 व आय टी अ‍ॅक्टच्या कलमाप्रमाणे कारवाई न करण्यासाठी रमेश लाहीगुडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती.

 

पथकाने पडताळणी केली असता, लाहीगुडे यांनी 80 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 35 हजार रुपये लाचेची मागणी स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सोमवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून 35 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रमेश लाहीगुडे यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे,
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Thane ACB Trap | API Ramesh Gangaram Lahigude Thane ACB Trap Mumbra Police Station

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम’ – देवेंद्र फडणवीस

Pune Crime | पोलीस चौकीजवळील मोबाइल शॉपीत चोरी; 12 लाखांचा मुद्देमाल लंपास

Shreya Bugade | श्रेया बुगडे ‘या’ विनोदवीराची चाहती; त्याच्यासाठी केली खास पोस्ट शेअर

Solapur News | दिव्यांग निधी मिळवण्यासाठीच्या आंदोलनात बहिणीपाठोपाठ अल्पवयीन भावाचा मृत्यू

 

Related Posts