IMPIMP

Tunisha Sharma Suicide Case | तुनिषा आत्महत्या प्रकणात पोलीस तपासात झाला खुलासा; ‘आत्महत्यापूर्वी तुनिषा आणि शिझान यांच्यात झाले होते संभाषण’

by nagesh
Tunisha Sharma Suicide Case | tunisha sharma suicide case tunisha committed suicide after talking to shizan for 15 minutes information disclosed in police investigation

सरकारसत्ता ऑनलाईन  – टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी (Tunisha Sharma Suicide Case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी तुनिषा शर्माच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची अजून वाढ केली आहे. यावेळी आत्महत्या (Tunisha Sharma Suicide Case) करण्याआधी तुनिषा आणि शिझान यांच्यात 15 मिनिटं संभाषण झाले होते हि माहिती उघड झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिझान याने तुनीषासोबत झालेल्या संभाषण मोबाईलमधून नष्ट का केले याचा तपास करण्यासाठी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती.
शिझान आणि तुनिषा यांच्यामध्ये ‘व्हाट्सअप’वर नेमके काय संभाषण झाले होते? याचा तपास पोलीस करत आहेत. शिझानने त्यावेळी काय बोलणे झाले हे सांगितले नाही. मात्र त्यावेळी सेटवर असलेल्या लोकांनी सांगितल्यानुसार जेवणाच्या सुट्टीच्या वेळात दोघांमध्ये बोलणं झालं, ज्यानंतर शिझान दरवाजा जोरदार आपटून खोलीतून बाहेर पडला होता, त्यानंतर तुनिषा खोलीत आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळली होती.

 

शिझान खान वारंवार त्याचा जबाब बदलत आहे. तसेच आतापर्यंत त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही,
त्यामुळे पोलिसांनी त्याची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.
यानुसार कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत शिझानच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
24 डिसेंबर रोजी अलिबाबा मालिकेच्या सेटवर तुनिषाने शिझानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून
आत्महत्या केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Tunisha Sharma Suicide Case | tunisha sharma suicide case tunisha committed suicide after talking to shizan for 15 minutes information disclosed in police investigation

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पतीच्या बाहेरख्यालीला विरोध केल्याने विवाहितेचा छळ; महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघांना अटक

State Bank of India (SBI) | आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळेल पेन्शन स्लिप आणि बॅलन्स डिटेल, जाणून घ्या कसे

 

Related Posts