IMPIMP

Turmeric Health Benefits | रक्तवाहिन्या आणि उतींसाठी देखील हळदीचा होतो फायदा?; जाणून घ्या नवीन संशोधन काय म्हणतं

by nagesh
Turmeric Health Benefits | turmeric is beneficial for blood vessels and tissues study

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – हळद (Turmeric) ही एक औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहे. हळदीचा उपयोग आहारामध्ये देखील केला जातो. अन् त्याचा उपयोग आरोग्यासाठी होतो (Turmeric Health Benefits). आता हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन (Curcumin) नावाचे संयुग कृत्रिम रक्तवाहिन्या (Artificial Blood Vessels) आणि ऊतकांच्या (Tissues) विकासासाठी फायदेशीर असल्याचे निष्कर्ष एका संशोधनातून समोर आलं आहे. याबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे (Turmeric Health Benefits).

कॅलिफोर्निया विद्यापीठ (University Of California), रिव्हरसाइडच्या (Riverside) संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, UC रिव्हरसाइड बायो इंजिनियर (UC Riverside Bioengineered) लवकरच प्रयोगशाळेत रक्तवाहिन्या आणि इतर ऊती विकसित करणार असल्याचे समजते. त्याचबरोबर ज्याचा उपयोग माणसात खराब झालेली ऊतके पुन्हा नीट करण्यासाठी अथवा नवीन निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म (Anti-inflammatory And Antioxidant Properties) असतात. हे कर्करोगाच्या ट्यूमरमध्ये एंजियोजेनेसिस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र, कर्क्यूमिन-कोटेड नॅनोपार्टिकल्सयुक्त मॅग्नेटिक हाइड्रोजेल वस्कुलर एंडोथेलियलच्या वाढीस प्रोत्साहन देणारे स्राव वाढवतात. वास्तविक, वस्कुलर रिजेनरेशनमध्ये करक्यूमिन वापरण्याची शक्यता आधीच व्यक्त केली होती. पण त्याबाबत अधिकृत माहिती नव्हती (Turmeric Health Benefits).

दरम्यान, यूसीआरच्या (UCR) मार्लन आणि रोझमेरी बोर्न्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मधील बायोइंजिनियरिंगचे प्राध्यापक हुयानन लिऊ (Professor Huan Liu) यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने कर्क्यूमिनच्या रिजनरेटिव्ह गुणधर्मांचा अभ्यास केला आहे.
कॅलिफोर्निया रिव्हरसाइड विद्यापीठातील या संशोधनासाठी प्रोफेसर लिऊ यांना त्यांचे विद्यार्थी राधा दया (Radha Daya), चांगलू झू (Changlu Zhu), न्हू-वाई (Nhu-Wai) आणि थि गुयेन (Thi Nguyen) यांनी मदत केली आहे.

प्रयोग कसा केला (How Did Experiment) ?
या अभ्यासामध्ये त्यांनी ताज्या डुकराच्या (Pig) ऊती मागे नळीच्या माध्यमातून
कर्क्यूमिन-कोटेड नॅनोकण (Curcumin-Coated Nanoparticles) सोडले आणि
चुंबकाच्या माध्यमातून त्यांची हालचाल यशस्वीरित्या निर्देशित केली आहे.
या प्रयोगामुळे ही पद्धत खराब झालेल्या ऊतींवर उपचार करण्यासाठी अथवा
तेथून त्या ऊतीं बदलण्यासाठी वापरली जाऊ शकते, याबाबत शक्यता आहे.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Turmeric Health Benefits | turmeric is beneficial for blood vessels and tissues study

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Sweat Control Tips | उन्हाळ्यात घाम जास्त येतो का?, जाणून घ्या ‘स्वॅट कंट्रोल’च्या 5 टिप्स

Maharashtra Police | सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी निलंबित तर पोलिस निरीक्षक संतोष घोळवेंची तडकाफडकी बदली

Women’s Health | उन्हाळ्यात पीरियड्समध्ये दुर्लक्ष करून नका ‘या’ 5 हायजीन टिप्सकडे, जाणून घ्या

Related Posts