IMPIMP

Sweat Control Tips | उन्हाळ्यात घाम जास्त येतो का?, जाणून घ्या ‘स्वॅट कंट्रोल’च्या 5 टिप्स

by nagesh
Sweat Control Tips | know the 5 tips for stopping your heavy sweating

सरकारसत्ता ऑनलाइन – Sweat Control Tips | उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे. या ऋतूमध्ये घरातून बाहेर पडताच अंगाला घाम येतो. जिममध्ये किंवा काम करताना जास्त घाम येतो. घाम येणे आरोग्यासाठी चांगले असते पण काही लोकांना खूप घाम येतो. तुमचा आहार आणि केमिकल बेस्ड प्रॉडक्टचा (Sweat Control Deodorant) वापर जास्त घाम (Sweat) येण्यास जबाबदार आहे. तुम्हालाही उन्हाळ्यात जास्त घाम येत असेल तर जाणून (how to control the sweat) घ्या त्याची कारणे आणि उपचार (Sweat Control Tips).

घाम म्हणजे काय (What Is Sweat)
जेव्हा-जेव्हा आपल्या शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील पाणी शोषून ते त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावर नेण्यासाठी घाम ग्रंथी सक्रिय होतात. शरीरातून बाहेर पडणारे हे पाणी उष्माघातासारख्या धोक्यांपासूनही आपले संरक्षण करते. शरीरातून बाहेर पडणार्‍या या पाण्याला घाम म्हणतात (Sweat Control Tips).

सेंट लुईस युनिव्हर्सिटीच्या त्वचा विज्ञानाच्या प्रोफेसर डी. अ‍ॅना ग्लेसर म्हणतात की, उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घाम येणे नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही प्रभावी उपाय देखील अवलंबू शकता (How To Control Sweat).

घाम नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाय (Effective Remedy For Control Sweat)

1. परफ्यूम वापरा (Use Perfume) :
जर तुम्हाला खूप घाम येत असेल, तर डिओड्रंट आणि अँटीपर्सपिरंट दोन्ही असलेले परफ्यूम वापरण्याचा प्रयत्न करा. काही लोक फक्त एक घेतात. तुम्ही फक्त एकच परफ्यूम वापरत असल्यास, हाय स्ट्रेंथ परफ्यूम वापरा.

2. बर्फाने मसाज करा (Massage With Ice) :
जर तुम्हाला अंडरआर्म, मान, कपाळावर जास्त घाम येत असेल तर तिथे बर्फाच्या तुकड्याने मसाज करा. हाताखालील भागात खूप घाम येत असेल तर तिथेही बर्फाने मसाज करा, घाम येणे कमी होईल.

3. शरीर हायड्रेटेड ठेवा (Keep Body Hydrated) :
उन्हाळ्यात खूप घाम येतो, अशावेळी शरीरातून जास्त पाणी बाहेर पडत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी, दही, कैरीचे पन्हे, ज्यूस, ताक, उसाचा रस, जलजीरा, शिंकजीचे सेवन करा.

4. सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळा (Avoid Soft Drinks) :
उन्हाळ्यात तहान शमवण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेकदा सॉफ्ट ड्रिंक्सचा वापर करतो.
परंतु तुम्हाला माहित आहे का, सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन केल्याने सीबमचे उत्पादन वाढू लागते आणि शरीर चिकट होऊ लागते.
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी लिंबूपाणी आणि नारळपाणी सेवन करा.

5. दिवसातून दोनदा आंघोळ करा (Take Bath Twice A Day) :
जास्त घाम येत असेल तर उन्हाळ्यामध्ये दोनदा आंघोळ करा.
उन्हाळ्यात दोनदा अंघोळ केल्याने तेलकट त्वचेपासून आराम मिळतो तसेच घामाचा वास निघून जातो.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Sweat Control Tips | know the 5 tips for stopping your heavy sweating

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Maharashtra Police | सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी निलंबित तर पोलिस निरीक्षक संतोष घोळवेंची तडकाफडकी बदली

Women’s Health | उन्हाळ्यात पीरियड्समध्ये दुर्लक्ष करून नका ‘या’ 5 हायजीन टिप्सकडे, जाणून घ्या

IPS Krishna Prakash Meet Sharad Pawar | बदलीनंतर IPS कृष्ण प्रकाश थेट शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीला; चर्चेला उधाण

Related Posts