IMPIMP

Uddhav Thackeray Government | पक्षांतर बंदी कायदा ! ‘ठाकरे सरकार’ वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना एवढ्या आमदारांची गरज

by nagesh
Maharashtra Political Crisis | decide to form an alliance with bjp today an ultimatum to uddhav thackeray of shinde group maharashtra political crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Uddhav Thackeray Government | विधान परिषद निवडणुकीनंतर (Vidhan Parishad Election 2022) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार (Uddhav Thackeray Government) अडचणीत आलं आहे. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे सूरतला रवाना झाले. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 29 आमदार (MLA) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेच्या (Shivsena) 55 पैकी 14 आमदार उपस्थित होते, त्यामुळे इतर आमदार कुठे आहेत ? एकनाथ शिंदे यांना नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे ? अशी उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पक्षांतर बंदी कायदा काय आहे ?

आमदार आणि खासदारांची होणारी फाटाफूट रोखण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा (Anti Defection Law) करण्यात आला आहे. या कायद्यानुसार एखाद्या पक्षातील दोन-तृतियांश आमदार फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. शिवसेनेच्या आमदारांची संख्या ही 56 होती पण रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यामुळे ही संख्या आता 55 आहे. पक्षांतर बंदी कायद्यातून वाचायचं असेल तर 55 च्या दोन तृतियांश म्हणजेच 37 आमदारांचे पाठबळ एकनाथ शिंदे यांना गरजेचं आहे. (Uddhav Thackeray Government)

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाथ 37 आमदार असतील तर त्यांना वेगळा गट तयार करता येऊ शकेल किंवा ते इतर कोणत्या पक्षात प्रवेश करु शकतात, यामुळे कोणत्याच आमदाराची आमदारकी धोक्यात येणार नाही, पण ही संख्या कमी झाली तर सगळ्या आमदारांना आपली आमदारकी सोडावी लागेल आणि पुन्हा एकदा या मतदारसंघात निवडणूक होईल.

 

 

Web Title :- Uddhav Thackeray Government | anti defection law how much mla cm uddhav thackeray need to save government

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी ! एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार ?

Chandrakant Patil | एकनाथ शिंदेंबरोबर तुमचं काही डील झालंय का?; चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

Fenugreek Water Benefits | मेथीच्या पाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर

 

Related Posts