IMPIMP

Uddhav Thackeray | ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद, पण…’; CM उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत म्हणाले…

by nagesh
Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolts maha vikas aghadi thackeray government in the minority letter to governor bhagat singh koshyari of shinde group

सरकारसत्ता ऑनलाइन – Uddhav Thackeray | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना (Shivsena) आणि महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) दोन्ही अडचणीत सापडले आहे. दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्या गोटात असल्याने राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरविण्यात आली. 2014 साली एकट्याच्या ताकदीवर 63 शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने दिले असल्याचे,” ते म्हणाले.

 

“काल परवा निवडणूक झाली. हाॅटेलमध्ये गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषत: पवार साहेबांनी सांगितले जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पुढे चालणार नाही. पवारांचा सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली. नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. तसेच, प्रशासनाची खूप मदत झाली असल्याचे,” ते म्हणाले.

 

उद्धव ठाकरे भावनिक होऊन म्हणाले की, “एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. ” असं ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, “माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे ? मी त्यांना आपले मानतो, त्यांचे माहिती नाही.
तुम्ही पळता कशाला ? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार.
आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.” अशी भावनिक साद उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना घातली आहे.
दरम्यान यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | I would be happy if Shiv Sena becomes Chief Minister but CM Uddhav Thackeray while interacting with the people said

 

हे देखील वाचा :

Indian Stock Market Today | Tata Steel, Reliance, Wipro चे शेअर घसरले, नंतर 52000 अंकाच्या खाली आला Sensex

Uddhav Thackeray | ‘…तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन’ – CM उद्धव ठाकरे

Mutual Fund investment | ‘या’ फंडने दिला शानदार रिटर्न ! 10 लाखांचे केले 41.41 लाख रुपये

 

Related Posts