IMPIMP

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली ? उद्धव ठाकरेचं भाजपकडे बोट

by nagesh
Uddhav Thackeray | those raised by the shiv sainiks went into the box thackeray targets shinde group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Uddhav Thackeray Interview | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेली मुलाखत चांगलीच गाजत आहे. उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये (Uddhav Thackeray Interview) केलेल्या वक्तव्यावर भाजप (BJP), मनसे (MNS) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) नेते संतापून प्रतिक्रिया देत आहेत. या मुलाखतीची चर्चा अजूनही सुरूच आहे. याच मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता की, शरद पवारांनी (Sharad Pawar) तुम्हाला मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली, असा आरोप होत आहे. यावर ठाकरे यांनीही थेट उत्तर दिले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

संजय राऊत यांच्या या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले की, या आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देत आहे असे हे लोक म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक त्यावेळेला भाजप शिवसेनेला काम करू देत नाही म्हणायचे. भाजप शिवसेनेला संपवेल, असा यांचा आरोप होता. (Uddhav Thackeray Interview)

 

ठाकरे म्हणाले, 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारल्या म्हणून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आपण जन्म दिला. तेव्हा हे लोक आता काँग्रेस (Congress) – राष्ट्रवादीवाले (NCP) त्रास देतात, असे म्हणत आहेत. हे लोक फक्त कारणे शोधत आहेत.

 

बंडखोरांना आधी भाजपबद्दल तक्रार होती, नंतर काँग्रेस – राष्ट्रवादीची तक्रार करू लागले.
त्यामुळे त्यांचे नेमके कारण काय आहे, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांची लालसा यासाठी कारणीभूत आहे.
त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने स्वत: ला मुख्यमंत्रीपद मिळवले.
आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले आहेत, ही आमची शिवसेना (Shivsena) आहे म्हणत आहेत.
अत्यंत घाणेरडा आणि दळभद्री असा हा प्रकार आहे.

 

आमदारांच्या बंडखोरीवर उद्धव ठाकरे म्हणाले, ते माझ्या कुटुंबाचेच घटक होते. मी भेटत नव्हतो.
माझ्या ऑपरेशनच्या काळात मी हलू शकत नव्हतो. तेव्हा काय भेटू शकणार होतो. माझे हात – पाय चालत नव्हते.
इतर वेळी हे आमच्या कुटुंबातील एक होते.
निधीचे कारण देतात, तर अजित पवारांनीच (Ajit Pawar) सांगितले की यांच्या एका खात्याला बारा हजार कोटी रुपये दिले.
एकदा मला निधी वाटपात असमानता दिसली, तेव्हा मी स्थगितीही दिली होती.
त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसून असमानतेचा प्रश्न सोडवलाही होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title : – Uddhav Thackeray Interview | shivsena chief uddhav thackerays reaction to allegation that sharad pawar ended the shiv sena by making uddhav thackeray the chief minister

 

हे देखील वाचा :

SBI Best Investment Scheme | एसबीआयच्या टॉप 5 स्कीम ! येथे 1 लाखाचे झाले 9.5 लाख, 10 वर्षात 857% पर्यंत मिळाला रिटर्न

Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?

Bank Holidays | ऑगस्टमध्ये आहेत अनेक सण, 17 दिवस बँका राहणार बंद, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी तपासून पहा सुट्ट्यांची यादी

 

Related Posts