IMPIMP

Unusual Symptoms of Diabetes | ‘ही’ 5 विचित्र लक्षणे आढळल्यास व्हा सावध, असू शकते डायबिटीजची सुरूवात; चुकूनही करू नका दुर्लक्ष!

by nagesh
Unusual Symptoms of Diabetes | 5 unusual and first stage symptoms of diabetes and high blood sugar

सरकारसत्ता ऑनलाइन – Unusual Symptoms of Diabetes | मधुमेहावर (Diabetes) कायमस्वरूपी उपचार नसला तरी त्यावर नियंत्रण मिळवून निरोगी जीवन जगता येते. सुरुवातीच्या अवस्थेत औषधांद्वारे तो आटोक्यात आणता येतो. यासाठी मधुमेहाची लक्षणे (symptoms Of Diabetes) प्राथमिक अवस्थेत आढळल्यास नियंत्रण ठेवता येऊ शकते. लक्षणे (Unusual Symptoms of Diabetes) वेळेवर ओळखणे आणि नियमित तपासणीने मधुमेह टाळता येऊ शकतो. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मधुमेहाची प्राथमिक लक्षणे कोणती जाणून घेवूयात (What Are The Primary Symptoms Of Diabetes)…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मधुमेहाची प्राथमिक लक्षणे (Basic Symptoms Of Diabetes)

1. हात आणि पायांना मुंग्या येणे (Tingling Of Hands And Feet)
हातापायांत मुंग्या येणे हे टाइप 2 मधुमेहाचे (Type 2 Diabetes) लक्षण आहे. ब्लड शुगरचे प्रमाण (Blood Sugar Level) वाढल्याने रक्तवाहिन्यांवर दाब येतो आणि त्यामुळे मुंग्या येतात. मज्जातंतू खराब झाल्याने मुंग्या येणे, पिन टोचल्यासारखं वाटणे, जळजळ किंवा तीक्ष्ण वेदना जाणवतात.

 

2. अचानक वजन कमी होणे (Sudden Weight Loss)
अचानक दिवसेंदिवस वजन कमी होऊ लागल्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा. कारण हे ब्लड शुगरचे लक्षण असू शकते. ग्लुकोज (Glucose) पेशींपर्यंत पोहोचत नाही तेव्हा शरीर समजू लागते की तुम्ही भुकेने व्याकूळ आहात आणि ती भरपाई करण्याचा मार्ग ते शोधू लागते. अशावेळी ते फॅट वेगाने बर्न करून ऊर्जा निर्माण केली जाते. (Unusual Symptoms of Diabetes)

 

3. फेसासारखी लघवी (Urine Like Foam)
वारंवार लघवी किंवा झोपेत असतानाही लघवीला होत असेल तर हे मधुमेहाचे स्पष्ट लक्षण असू शकते. लघवी फेसाळ होत असेल तर लघवीमध्ये प्रोटीन असल्याचे लक्षण असू शकते. याचा किडनीत काहीतरी समस्या (Kidney Problems) असू शकते. ज्यामध्ये रक्तातील हाय ब्लड शुगरशी सामना करण्याचा प्रयत्न समाविष्ट असू शकतो, जसे की मधुमेहामध्ये होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. विनाकारण थकवा जाणवणे (Feeling Unnecessarily Tired)
पूर्ण आणि शांत झोप घेवूनही दिवसभर थकवा (Fatigue) जाणवत असल्यास ब्लड शुगर टेस्ट (Blood Sugar Test) करू घ्या. अशप्रकारे थकवा जाणवणे मधुमेहाचे लक्षण आहे. मात्र, थकवा हा इतरही काही आजारांचे लक्षण असल्याने प्रथम डॉक्टरांकडे जा.

 

5. पोटभर नाश्ता करूनही भूक लागणे (Feel Hungry Shortly After Breakfast)
पोटभर नाश्ता केल्यानंतर काही वेळातच भूक लागत असेल तर हे ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण असू शकते.
असे लक्षण आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्नायूंना अन्नातून आवश्यक ऊर्जा (Energy) मिळत नाही.
शरीराची इन्सुलिन (Insulin) प्रतिरोधक क्षमता ग्लुकोजला स्नायूंमध्ये प्रवेश करण्यापासून आणि ऊर्जा प्रदान करण्यापासून प्रतिबंधित करते,
यामुळे खाल्ल्यानंतर पुन्हा भूक लागते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Unusual Symptoms of Diabetes | 5 unusual and first stage symptoms of diabetes and high blood sugar

 

हे देखील वाचा :

Sachin Tendulkar | ‘तुला भारतीय जिवंत जाळतील’; जेव्हासचिन तेंडुलकरने ‘या’ खेळाडूला दिली होती सक्त ताकीद

Weight Loss | वजन कमी करायचे असेल तर ‘या’ 5 पद्धतीने करा ‘मेटाबॉलिज्म बूस्ट’, वेगाने नियंत्रित होईल वजन

EPFO e Nomination Change Online | EPS आणि PF अकाऊंटमध्ये ई-नॉमिनी बदलायचा आहे का, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

 

Related Posts