IMPIMP

Weight Loss | वजन कमी करायचे असेल तर ‘या’ 5 पद्धतीने करा ‘मेटाबॉलिज्म बूस्ट’, वेगाने नियंत्रित होईल वजन

by nagesh
Weight Loss | if you want to lose weight then boost metabolism in these 5 ways

सरकारसत्ता ऑनलाइन – Weight Loss | वाढते वजन ही सर्वात मोठी समस्या आहे, वाढत्या वजनामुळे शरीर अनेक आजारांच्या विळख्यात सापडते. वाढत्या वजनामुळे हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure), हृदयविकार (Heart Disorder), स्त्रियांमध्ये वंध्यत्व (Infertility), टाईप 2 डायबिटिज (Type 2 Diabetes), स्ट्रोक (Stroke) आणि अस्थमा (Asthma) यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. जेव्हा जेव्हा वजन कमी करण्याचा किंवा वजन नियंत्रित (Weight Control) करण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपण सर्वप्रथम आहारावर नियंत्रण (Weight Loss) ठेवतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पण तुम्हाला माहिती आहे की आहारावर नियंत्रण (Dietary Control) ठेवल्यानेही लठ्ठपणा (Obesity) कमी होत नाही, परंतु मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढवणार्‍या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने लठ्ठपणा कमी होतो.

 

ज्या लोकांचे मेटाबॉलिज्म मंद असते, त्यांचे वजन लवकर कमी होत नाही, त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात मेटाबॉलिज्म बूस्ट करणे महत्त्वाचे आहे. जर तुमची मेटाबॉलिज्म क्रिया जास्त असेल, तर तुम्ही विश्रांतीमध्ये अधिक कॅलरीज बर्न (Calories Burn) करू शकता, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल (Weight Loss).

 

मेटाबॉलिज्म कसे करते वजन नियंत्रित (How Metabolism Controls Weight) :
काही पदार्थ तुमचा मेटाबॉलिज्म रेट (Metabolism Rate) वाढवण्यास मदत करू शकतात. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वजन वेगाने नियंत्रित करता येते. तुमचे मेटाबॉलिज्म जितके अधिक वाढेल, तितके तुम्ही उत्साही आणि सक्रिय व्हाल.

 

खराब मेटाबॉलिज्ममुळे (Bad Metabolism), शरीराला थकवा (Fatigue), हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol), स्नायू कमकुवत होणे (Muscle Weakness), कोरडी त्वचा (Dry Skin), वजन वाढणे (Weight Gain), सुजलेले सांधे (Swollen Joints), मासिक पाळीचा त्रास (Menstrual Cramps), नैराश्य (Depression) आणि हृदयाची धडधड (Heartbeat) यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास मेटाबॉलिज्म क्रिया वाढवता येते तसेच वजन नियंत्रित ठेवता येते. मेटाबॉलिज्म कसे वाढवायचे ते जाणून घेऊया.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

असे वाढवा मेटाबॉलिज्म (Increase Metabolism)

1. प्रोटीनयुक्त अन्नाचे सेवन करा (Eat Protein Rich Foods) :
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक जेवणात प्रोटीन घेतल्याने मेटाबॉलिज्म 15 ते 30 टक्के वाढण्यास मदत होते.
आहारात मटण (Meat), मासे (Fish), अंडी (Eggs), काजू (Nuts) आणि बिया (Seeds) खा. हे पदार्थ मेटाबॉलिज्म वेगाने वाढवतील.

 

2. आहारात करा मिनरलयुक्त पदार्थांचा समावेश (Include Minerals In The Diet) :
मिनरल (Mineral), आयर्न (Iron) आणि सेलेनियमचे (Selenium) सेवन आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे,
ते आपले मेटाबॉलिज्म नियंत्रित करतात. शरीराला आवश्यक मिनरल मिळवण्यासाठी आहारात मांस, सीफूड, शेंगा, नट आणि बियांचा समावेश करा.

 

3. नियमित व्यायाम करा (Exercise Regularly) :
मेटाबॉलिज्म वाढवायचे असेल तर नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि जलद वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते.

 

4. मिरचीचे सेवन करा (Eat Chili) :
मिरचीचे सेवन केल्याने मेटाबॉलिझमला चालना मिळते. मिरचीमध्ये असलेले Capsaicin केमिकल जलद कॅलरी बर्न करण्याचे प्रमाण वाढवते
आणि मेटाबॉलिज्म देखील वाढवते. मिरचीचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला दररोज सुमारे 50 अतिरिक्त कॅलरीज बर्न करता येतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

5. पुरेशी झोप घ्या (Get Enough Sleep) :
कमी झोपेमुळे तुमचे वजन वाढू शकते. वजन कमी करायचे असेल तर पुरेशी झोप घ्या. पुरेशी झोप म्हणजे 6-7 तासांची पूर्ण झोप घ्या.
मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे.

 

Web Title :- Weight Loss | if you want to lose weight then boost metabolism in these 5 ways

 

हे देखील वाचा :

EPFO e Nomination Change Online | EPS आणि PF अकाऊंटमध्ये ई-नॉमिनी बदलायचा आहे का, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

PM Kisan Samman Nidhi Yojana | खुशखबर ! सरकार शेतकर्‍यांना पुढील महिन्यात वाटप करणार 2000 रुपये, लाभ घेण्यासाठी Download करावे ‘हे’ विशेष App

Pune Crime | कोंढव्यातील पाणी प्रश्नावर आंदोलन ! मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

 

Related Posts