IMPIMP

US Share Market | आर्थिक संकटात अमेरिका ! केवळ एका कारणासाठी हादरला US शेअर बाजार

by Team Deccan Express
US Share Market | us stock market crash due to inflation and economic recession risks other reasons

नवी दिल्ली : US Share Market | जगभरातील शेअर बाजार (Global Share Market) सध्या मोठ्या प्रमाणात विक्रीचा सामना करत असल्याचे दिसत आहे. बुधवारी अमेरिकेच्या बाजारात (US Share Market) विक्रीचे भीषण दृश्य पाहायला मिळाले. वॉल स्ट्रीट (Wall Street) च्या विध्वंसाने गुंतवणूकदारांना (Investors) पुन्हा दिवसा तारे दाखवले. एस अँड पी 500 (S&P500) आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अ‍ॅव्हरेज (Dow Jones Industrial Everage), ही दोन वर्षांतील जवळपास सर्वात मोठी घसरण होती. (US Share Market Marathi News)

 

इतका घसरला अमेरिकन शेअर बाजार

बुधवारच्या व्यवहारात चौफेर झालेल्या विक्रीनंतर एस अँड पी 500 मध्ये 4.04 टक्क्यांनी घसरण झाली. टेक-फोकस्ड इंडेक्स नास्टॅक कंपोझिट (Nasdaq Composite) 4.73 टक्क्यांनी खाली आला. त्याचप्रमाणे, डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल अ‍ॅव्हरेज 3.57 टक्क्यांनी घसरला.

 

या वर्षी आतापर्यंत, एस अँड पी 500 सुमारे 18 टक्के खाली आहे. जानेवारीपासून Nasdaq 27 टक्क्यांनी घसरला. एसअँडपी 500 वर सूचीबद्ध केलेले दोन तृतीयांश स्टॉक सध्या त्यांच्या 52-आठवड्यांच्या उच्चांकावरून 20 टक्के किंवा त्याहून अधिक खाली आहेत. (US Share Market)

 

गुंतवणूकदारांना रडवतेय विक्रमी महागाई

विक्रमी उच्चांकी महागाई (Inflation) मुळे बाजाराची स्थिती बिघडत चालली आहे. यूएसमधील किरकोळ चलनवाढ एप्रिलमध्ये 8.3 टक्क्यांपर्यंत कमी झाली, परंतु ती अजूनही दशकांच्या उच्च पातळीवर आहे. यापूर्वी मार्चमध्ये अमेरिकेतील महागाईचा दर 8.5 टक्के होता, जो गेल्या 41 वर्षांतील सर्वोच्च होता. फेडरल रिझर्व्हने रेपो दरात वाढ करूनही महागाई अपेक्षेप्रमाणे आटोक्यात आलेली नाही.

 

यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. दुसरीकडे, फेडरल रिझर्व्हने या आठवड्यात स्पष्ट केले आहे की जोपर्यंत ते महागाईवर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत व्याजदर वाढतच राहतील. याचा परिणाम बाजारभावावरही झाला.

 

आर्थिक मंदीचा धोका

अमेरिकन बाजारातील प्रचंड घसरणीमागे महागाई हे प्रमुख कारण असल्याचे विश्लेषक मानत आहेत.
याशिवाय रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Russia-Ukraine War),
ग्लोबल सप्लाय चेन (Global Supply Chain), चीनमध्ये महामारीच्या नवी लाटेमुळे लावलेला
लॉकडाऊन आणि केंद्रीय बँकांनी बाजार खाली आणण्यासाठी कडक केलेले आर्थिक धोरण बाजार कोसळण्याची इतर करणे आहेत.
वेल्स फार्गो इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूटच्या मते, अमेरिकेत या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक मंदी येऊ शकते.

 

Web Title :- US Share Market | us stock market crash due to inflation and economic recession risks other reasons

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts