IMPIMP

Veer Savarkar Case | ठाकरेंनी सुनावलं, पवारांनी खडसावलं, सावरकर मुद्यावरुन राहुल गांधी एक पाऊल मागे; हायव्होल्टेज बैठकीत काय झालं?

by nagesh
Veer Savarkar Case | sharad pawar played the role of mediator between shivsena and rahul gandhi in the veer savarkar case

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Veer Savarkar Case | काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी सावरकरांबद्दल केलेल्या
वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि.27) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress President Mallikarjun
Kharge) यांच्या घरी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राहुल गांधी यांच्या समोर नाराजी व्यक्त केली.
सावरकरांवरील टीका (Veer Savarkar Case) टाळावी, त्यांना ‘माफीवीर’ संबोधणं योग्य नाही, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांना खडसावलं. यावर
खर्गे यांनी सहमती दर्शवली. यानंतर कुणाच्या भावना दुखावत असतील तर मी टीका करणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. या बैठकीवर
ठाकरे गटाने (Thackeray Group) बहिष्कार टाकला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सोमवारी नवी दिल्ली येथे विरोधकांची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी राहुल गांधी, शरद पवार तसेच विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. बैठकीमध्ये भाजपला (BJP) तोंड देण्यासाठी विरोधकांनी विशेष रणनीतीवर चर्चा केली. यावेळी सावरकर मुद्यावरही (Veer Savarkar Case) चर्चा झाली.

 

‘माफीवीर’ संबोधणं योग्य नाही – शरद पवार

यावेळी शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वीर सावरकर यांचे महत्त्व समजावून सांगितले. सावरकरांचं विविध क्षेत्रांतील योगदान लक्षात घेता त्यांना ‘माफीवीर’ संबोधणे योग्य नसल्याचे सांगत सावरकरांवरील टीका टाळायला पाहिजे, असं पवार राहुल गांधी यांना उद्देशून बोलले. यावर खर्गे यांनी देखील होकारार्थी मान डोलावली.

 

तर मी टीका करणार नाही – राहुल गांधी

शरद पवार यांनी सावरकरांच्या मुद्यावरुन समज दिल्यानंतर राहुल गांधी यांनी एक पाऊल मागे घेतलं. जर माझ्या टीकेने कुणाच्या भावना दुखवणार असतील तर मी टीका करणार नाही, मी तो वाद टाळण्याचा प्रयत्न करेन, असं राहुल गांधी यांनी शरद पवारांना आश्वस्त केलं.

 

पवारांनी मध्यस्थाची भूमिका निभावली

सावरकर मुद्यावरुन सुरु असलेल्या वादात शरद पवार यांनी ज्येष्ठत्वाच्या नात्याने
एक पाऊल पुढे टाकत मध्यस्थाची भूमिका निभावली. सावरकरांवरुन वाद घालण्यापेक्षा काही मुद्दे
टाळून भाजपचा विजयी वारु लोकसभेत कशा प्रकारे रोखता येईल, भाजपवर अॅटॅक
करण्यासाठी कोणते मुद्दे असावेत, अशी जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे.
विरोधी पक्षांनीही त्याच अनुषंगाने टिका टिप्पणी करावी,
अशी भूमीका शरद पवार यांनी बैठकीत मांडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Veer Savarkar Case | sharad pawar played the role of mediator between shivsena and rahul gandhi in the veer savarkar case

 

हे देखील वाचा :

MLA Sanjay Shirsat | आमदार संजय शिरसाट भडकले; म्हणाले – ‘जशास तसे उत्तर देणार, आमदारकी गेली उडत’

Jayant Patil On President Rule In Maharashtra | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता, जयंत पाटील यांचा दावा

Pune Katraj Kusti News |14 वर्षाखालील मुलींसाठी कात्रज येथे कुस्ती स्पर्धा ! कै.पै. वसंतराव सयाजी बेनकर यांच्या स्मरणार्थ आयोजन, महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी यांची उपस्थिती आणि सत्कार

 

Related Posts