IMPIMP

Virat Kohli | याला म्हणतात जिगर ! विराट-रोहितमध्ये ‘क्रॉस’ आहे म्हणणाऱ्यांनी हा Video नक्की पाहा

by nagesh
Virat Kohli Those who say that there is a cross between Virat and Rohit should definitely watch this video

सरकारसत्ता ऑनलाइन – भारत आणि श्रीलंकेमध्ये (IND vs SL) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला मोठं टार्गेट दिलं आहे. (Virat Kohli) विराट कोहलीचा हा 100 वा सामना आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी झाल्यावर भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी (Fielding) येत होते त्यावेळी संघातील वातावरण किती चांगल्या प्रकारचं आहे हे पाहायला मिळालं. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) सर्व खेळाडू मैदानात येत होते त्यावेळी रोहितने बाकी खेळाडूंना बाजूला थांबवत त्यांच्या मधून ‘किंग’ कोहलीची (Virat Kohli) ग्रँड एँन्ट्री केली. विराटच्या या एँन्ट्रीचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विराटने कर्णधारपद सोडलं त्यावेळी भारतीय संघात तणावाचं वातावरण असल्याच्या चर्चा होत्या. कारण कसोटीनंतर विराट एकदिवसीय (ODI match) सामन्यात खेळणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र रोहितच्या या वृत्तीने त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद (Argument) नसून ते चांगले मित्र असल्याचं दिसून आलं.

 

भारताने प्रथम फलंदाजीला येत श्रीलंकेला 574 धावांचा भला मोठा डोंगर दिला आहे.
यामध्ये ऋषभ पंतचं (Rishabh Pant) शतक अवघ्या चार धावांनी हुकलं मात्र त्यानंतर आलेल्या सर जडेजाने (Ravindra Jadeja) दमदार फलंदाजी करत शतक पूर्ण केलं.
शतकानंतर जडेजाने आपली नेहमीच्या अंदाजात बॅट तलवारीप्रमाणे फिरवली. जडेजा नाबाद राहिला त्यानं आपल्या खेळीत 175 धावा केल्या यामध्ये 17 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.
तर त्याला साथ दिली ती आर. आश्विनने, (R. Ashwin) त्याने 61 धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. (Virat Kohli)

 

 

दरम्यान, श्रीलंका संघ (Sri Lanka team) फलंदाजी करत असून आतापर्यंत त्यांचे 130 धावांवर 3 गडी बाद झाले आहेत.
आश्विन, जडेजा आणि बुमराह (Bumrah) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

 

Web Title :- Virat Kohli Those who say that there is a cross between Virat and Rohit should definitely
watch this video

 

हे देखील वाचा :

PM Narendra Modi Visit To Pune | पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा ! ‘पालिका निवडणुकीतील पराभवाची भाजपची कबुली’ – माजी आमदार मोहन जोशी

Sharad Pawar | ‘मेट्रोचं काम झालं नसतानाही उद्घाटन’; शरद पवारांचा PM मोदींना टोला

Sharad Pawar | ‘..तेव्हा नारायण राणेंचा राजीनामा घेतला का ?’; शरद पवारांचा भाजपला सवाल

 

Related Posts