IMPIMP

Weather Update | काही राज्यांना उन्हाचा चटका तर ‘या’ राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता; IMD

by nagesh
Maharashtra Weather Update | temperature may goes high in maharashtra heat will increase in vidarbha

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Weather Update | महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका (Weather Update) लागला आहे. एकीकडे उन्हाचा चटका असताना अनेक राज्यात पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईशान्य भारत (Northeast India), आसाम (Assam), मेघालय (Meghalaya), नागालँड (Nagaland), मणिपूर (Manipur) आणि मिझोराम (Mizoram) या दक्षिणेकडील राज्यांसह तमिळनाडू (Tamil Nadu) आणि केरळमध्ये (Kerala) या आठवड्यात पाऊस पडू शकतो. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये आगामी दिवसात तापमान (Temperature) वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून Indian Meteorological Department (IMD) वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

12 एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होईल, ज्यामुळे उत्तर – पश्चिम भारतातील अनेक भागात कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे.
या हवामान प्रणालीमुळे प्रभावित झालेल्या राज्यात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.
आगामी पाच दिवसांत या राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने या ठिकाणी नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. (Weather Update)

 

12 ते 14 एप्रिलपर्यंत पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या वेगळ्या भागात उष्णतेच्या लाटेची तीव्र शक्यता आहे. उत्तर प्रदेश (पूर्व आणि पश्चिम) आणि पश्चिम मध्य प्रदेशात उष्णतेची लाट कायम राहील. याशिवाय बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये आगामी 5 दिवसांत पाऊस होण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये 11, 12, 13 आणि 14 एप्रिलला तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर 13 आणि 14 एप्रिलला अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम तर त्रिपुरामध्ये 10, 13 आणि 14 एप्रिलला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title :- Weather Update | heat will increased and rain in these states in upcoming days

 

हे देखील वाचा :

Pune-Ahmednagar Highway Accident | कारला धडकून लक्झरी बस पलटली अन् हॉटेलमध्ये घुसली; कारचालक ठार, 25 प्रवासी जखमी

Pune Crime | पुण्यात प्रेमसंबंधातून प्रेमिकेचा खून; हडपसर परिसरातील घटना

Pune Crime | मुलांना शाळेत घेऊन जाणार्‍या रिक्षाचा अपघात, 9 विद्यार्थी जखमी; उरुळी कांचनजवळील बोरीभडक गावातील घटना

 

Related Posts