IMPIMP

Whatsapp Cryptocurrency Payment | ‘व्हॉट्सअप’ने केली घोषणा, आता क्रिप्टोकरन्सीमध्ये सुद्धा पैशांचा व्यवहार करू शकतात यूजर्स

by nagesh
Whatsapp Cryptocurrency Payment | Whatsapp Launches Cryptocurrency Payment in the US with Novi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Whatsapp Cryptocurrency Payment | व्हॉट्सअप पेमेंट सर्व्हिस (WhatsApp Payment Service) जगभरात संथ गतीने रोलआऊट होत असली तरी कंपनीने आज एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले की, व्हॉट्सअप (WhatsApp Pay) चा वापर करून आता अमेरिकेत लोक एकमेकांना क्रिप्टोकरन्सी सुद्धा ट्रान्सफर (Transfer cryptocurrency using WhatsApp) करू शकतील. (Whatsapp Cryptocurrency Payment)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

व्हॉट्सअप आणि नोव्हीची भागीदारी
9to5mac. com च्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअपचे सीईओ विल कॅथकार्ड (Will Cathcard) आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कॅसरिअल (Stephane Kasriel) यांनी मिळून याबाबत घोषणा केली. नोव्ही (Novi) सुद्धा मेटा (Meta) चे एक डिजिटल वॉलेट आहे.

 

फिचर सध्या काही लोकांपर्यंतच
व्हॉट्सअपने हे फिचर सध्या काही लोकांपर्यंतच पोहचवले आहे, म्हणजे ज्या लोकांपर्यंत हे फीचर पोहचले आहे ते या मॅसेंजर अ‍ॅपद्वारे पैसे पाठवू शकतील आणि प्राप्त करू शकतील.

नोव्हीने आपल्या वेब पेजवर काय लिहिले
नोव्ही (Novi) च्या वेबपेजनुसार, ही सर्व्हिस पैसे पाठवणे आणि प्राप्त करण्यासाठी एक नवीन पद्धत आहे. यासाठी कोणतीही फी द्यावी लागत नाही. ही यूजरला चॅट न सोडता पैसे पाठवण्याची सवलत देते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

कंपनी करतेय एका stablecoin वर काम
यापूर्वी सुद्धा फेसबुक (Facebook) व्हॉट्सअपच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) चे पेमेंट करण्याच्या योजनेचा खुलासा केला आहे. 2018 च्या एका रिपोर्टमध्ये Bloomberg ने म्हटले होते की, कंपनी एका stablecoin वर काम करत आहे.

 

गुएटेमालामध्ये सुद्धा सर्व्हिसची टेस्टिंग
जाणकार लोकांनी सांगितले की, कंपनी एक स्टेबलकॉइन (stablecoin) डेव्हलप करत आहे. ही एक प्रकारची डिजिटल करन्सी असेल, जी अमेरिकन डॉलरशी संबंधीत असेल आणि यामध्ये खुप कमी व्होलॅटिलिटी (volatility) असेल.

 

आता तीन वर्षानंतर व्हॉट्सअपने नोव्हीसोबत भागीदारी करत लोकांना क्रिप्टोकरन्सी वापर करत पैसे ट्रान्सफर करण्याची सवलत दिली आहे. अमेरिकेशिवाय गुएटेमाला (Guatemala) मध्ये सुद्धा या सर्व्हिसची टेस्टिंग होत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Whatsapp Cryptocurrency Payment | Whatsapp Launches Cryptocurrency Payment in the US with Novi

 

हे देखील वाचा :

LPG Subsidy | स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, तुमच्या खात्यात पैसे आले किंवा नाही ‘या’ पध्दतीनं तपासा

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले – ‘शिवसेनेचा मोठा भाऊ म्हणून आदर करु, पण…’

BMC Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र; कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी

 

Related Posts