IMPIMP

क्वारंटाईन सेंटरमधून पळ काढण्याच्या प्रयत्नात तरुणी अडकली ग्रीलमध्ये

by bali123
young woman escaped quarantine center pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पुण्यातील एका 18 वर्षीय तरुणीला क्वारंटाईन सेंटर quarantine center मधून पळून जाण्याचा प्रयत्न करणे चांगलेच अंगलट आले आहे. दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर पडताना तरुणी खिडकीच्या गजामध्ये अडकली. अखेर अग्निशमन दलाला ग्रील तोडून तिची सुटका करावी लागली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

याबाबतची माहिती अशी की, एरंडवणे येथील एका क्वारंटाइन सेंटर quarantine center मधून संबधित तरूणीने सोमवारी (दि. 15) रात्री साडे अकराच्या सुमारास पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मजल्यावरून खाली जाण्याच्या विचारात ती होती. त्यानुसार तिने खिडकीचा वापर करण्याचे ठरवले अन् पुढे भलतच घडले. सदर तरूणी खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली. अनेकांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ती काही बाहेर येईना. अखेरीस नागरिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलीला धीर देत खिडकीचे गज कापून तिची सुटका केली. यावेळी हायड्रलिक कटरचा वापर करावा लागला. कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून क्वारंटाइन सेंटर उभारली आहेत. मात्र, तिथूनही नागरिक पळून जात असल्याने आता प्रशासनाच्या समोर नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत अजित पवारांचे विधान, म्हणाले…

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

 

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

 

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts