IMPIMP

विधानभवनात असूनही मुख्यमंत्री सभागृहात का आले नाहीत? : देवेंद्र फडणवीस

by amol
Devendra Fadnavis's 'secret blast'; Said - 'Uddhav Thackeray had put pressure on him for police officer Sachin vaze to get back to office'

मुंबई : Devendra Fadnavis उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्यानंतर काही दिवसांतच या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद आढळला. त्यामुळे राजकारण तापले आहे. विरोधकांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. विधानसभेत या प्रकरणावर खडाजंगी सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे आता यावर सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री ठाकरे हे विधानभवनात असूनही सभागृहात आले नाहीत. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, सभागृहातील वातावरण गंभीर होते. त्यावेळी मुख्यमंत्री येत असतात. सभागृह शांत करतात. त्यानंतर अध्यक्षांसोबत बैठका करत असतात. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे विधान भवनात उपस्थित असूनही सभागृहात आले नाहीत. तसेच ते अध्यक्षांकडेही आले नाहीत. अध्यक्षांकडे ठरले ते मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर का बदलले, असेही ते म्हणाले. याशिवाय मनसुख हिरेन प्रकरणावर बोलताना फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, एनआयए, एसआयटी या तपास संस्था सक्षम आहेत. काय शिजलंय ते बाहेर येऊ नये म्हणून कारवाई होत नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना हटवायला पाहिजे असे म्हटले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक का बदलले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

Maratha Reservation : ‘अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणांचं काहीही देणं-घेणं नाही’ : देवेंद्र फडणवीस

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts