IMPIMP

माजी आमदाराकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; परवानगी नसतानाही जाहीर सभा अन् सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

by amol
Asif Sheikh

मालेगाव : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सरकारने कोरोनाविषयक नियमावली लागू केल्या आहेत. त्यामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे सांगितले आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवरही सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, याचे मालेगावात उल्लंघन करण्यात आले.

माजी आमदार आसिफ शेख यांनी काल (शुक्रवार) रौनकाबाद येथे जाहीर सभा घेतली होती. त्यांच्या या सभेला समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. या सभेत कोरोना नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. सभेत उपस्थित असणाऱ्या अनेकांनी तोंडाला मास्क लावला नव्हता. मात्र, आता कोरोनाविषयक नियमावलीचे उल्लंघन करणे माजी आमदार शेख यांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण आता या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, आसिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

परवानगी नसतानाही सभा

मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आसिफ शेख यांच्या जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीदेखील आसिफ शेख यांनी याकडे दुर्लक्ष करत जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेतील अनेकांनी मास्कही लावला नव्हता. त्यामुळे आता शेख यांच्यावर पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

Leave a Comment