IMPIMP

जेव्हा CM ठाकरे फडणवीसांकडे पाहून म्हणाले – ‘निर्लज्जपणानं का नाकारता ?…’

by sikandershaikh
Uddhav-thackeray-devendra-fadanvis

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)uddhav thackeray | विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार, दि 3 मार्च) देखील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. सीमा भाग, मराठी भाषा दिन, स्वातंत्र्यवीर सावरकर, संभाजीनगर आणि हिंदुत्व, भाजप-सेना युती अशा अनेक मुद्द्यांवरूनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर सडकून टीका केली. जणू काही आज सीएम ठाकरेंचं रौद्ररूप पाहायला मिळालं. भाजपला त्यांनी थेट निर्लज्ज संबोधलं. ठाकरे बोलत असताना भाजप सदस्यही चिडीचूप होते.

‘…तेव्हा देवेंद्र फडणवीस याना दाराबाहेर ठेवलं होतं’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तरी आठवण ठेवलीत त्याबद्दल तुमचे आभारीच आहोत. परंतु तुम्हाला आज बाळासाहेबांचे उमाळे येत आहेत. त्याच बाळासाहेबांच्या खोलीत भाजप नेते अमित शाह आणि आमच्यात चर्चा झाली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना दाराबाहेर ठेवलं होतं.

‘बंद दाराआड ठरलेली गोष्ट तुम्ही निर्लज्जपणे नाकारता…’

पुढं बोलताना सीएम ठाकरे म्हणाले, फडणवीसांना बाहेर ठेवून मी आणि अमित शाह आत होतो.
बंद दाराआड ठरलेली गोष्ट तुम्ही निर्लज्जपणे नाकारता.
निर्लज्ज हा शब्द असंसदीय असला तरी मी तो वापरतो. हेच तुमचं हिंदुत्व.
हे तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम ? असे अनेक सवाल त्यांनी केले.
इतकंच नाही तर बाळासाहेबांची खोली तुमच्यासाठी एखादी खोली असू शकते,
पण आमच्यासाठी ते मंदिर आहे असंही ठाकरे फडणवीसांना उद्देशून म्हणाले.

Related Posts