IMPIMP

Pune News | प्रसिद्ध हॉटेल ‘प्यासा’वर पोलिसांचा छापा ! बेकायदा दारु विक्री व हुक्का पार्लर चालविल्यावरुन कारवाई

by sikandershaikh
Pune News

पुणे (pune news) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) pune news | शहरातील प्रसिद्ध हॉटेल प्यासावर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा घालून अवैध मद्य विक्री आणि हुक्का पार्लर चालविण्याबद्दल कारवाई केली.

शहरात पोलिसांची कृपादृष्टी असलेल्या काही मोजक्या हॉटेलमध्ये प्यासा या मंडईमधील हॉटेलची गणना होते. या हॉटेलवर आजवर कधी कारवाई झाली नसल्याचे सांगितले जाते. शहर पोलिसांनी सुरु केलेल्या मोहिमेत आता प्यासाचा नंबर लागला आहे.

पोलीस उपायुक्त प्रिंयका नारनवरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता हॉटेल प्यासावर छापा टाकला.
त्यात हॉटेलचा मॅनेजर मनोज शेट्टी याने अवैधपणे हुक्का पार्लर चालवून व बार व्यतिरिक्त रोडलगत मद्य
विक्रीकरीता वेगळे काऊंटर बनवून तेथे विनापरवाना अनधिकृतपणे मद्यविक्री करीत असताना मिळून आला.
पोलिसांनी या हॉटेलमधून १ लाख १० हजार ६३० रुपयांचे विदेशी मद्य,
रोख ६ हजार ७२० रुपये व १९१० रुपयांची हुक्क्याची साधने असा १ लाख १९ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी हॉटेलचा मॅनेजर मनोज शेट्टी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Posts