IMPIMP

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘मराठा समाजाला आरक्षण द्या; अन्यथा परिणामांना सामोरे जा’

by sikandershaikh
chandrakant-patil-uddhav-thackeray

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)chandrakant patil | मराठा आरक्षणावरच स्थिगिती का?  मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर परिणामांना सामोरे जा, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. जातीचे आरक्षण देणे हा केंद्राचा विषय नाही. हा राज्याचा विषय आहे. तामिळनाडू सरकारने स्वत: आरक्षण दिले आहे. तामिळनाडू सरकार केंद्राकडे गेले नव्हते. इतर राज्याने आपल्या ताकदीवर जसे आरक्षण दिले आणि टिकवले. तसेच महाराष्ट्र सरकारनेही आपल्या ताकदीवर आरक्षण टिकवले पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली. केंद्र सरकारचा रोल केवळ 10 टक्के आरक्षणाशी संबंधित असल्याचेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 5) विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक नसावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पण याच निर्णयात असाधारण स्थिती निर्माण झाल्यावर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकते, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. तेव्हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत उच्च न्यायालयाला कन्व्हिन्स केले होते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणही मिळाले आणि मागासवर्ग आयोगाला मंजुरीही मिळाली. मात्र, हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयाला कन्व्हिन्स करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे पाटील म्हणाले.

Related Posts