IMPIMP

Pune : ZP तील अंतर्गत वादाची अजित पवारांनी घेतली दखल; दोन्ही गटांची केली ‘कानउघडणी’

by nagesh
ajit pawar-zp pune

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पुणे जिल्हा परिषदेतील विकासकामांच्या नियमबाह्य याद्यांची आणि पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजीची जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या नियमबाह्य कामांबाबत त्यांनी झेडपीचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची जोरदार कानउघडणी केली.

झालं गेलं विसरा आणि किमान यापुढे तरी जरा समजून उमजून नियमानं काम करा असा सल्ला अजित पवार यांनी पदाधिकारी आणि अधिकारी यांना दिला.

पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत त्यांनी ही अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अभ्यासू कार्यकर्त्याचं उदाहरणही दिलं. दरम्यान जिल्हा नियोजन अधिकाऱ्यानं विकासकामांच्या याद्या तयार करताना जिल्हा परिषदेला कल्पनाच दिली नाही अशी तक्रार पदाधिकाऱ्यांनी पवारांकडे केली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत काही पदाधिकाऱ्यांमध्ये अतंर्गत मतभेत आणि मनभेद निर्माण झाले आहेत. त्यातूनच पदाधिकाऱ्यांमध्ये अतंर्गत गटबाजी सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच कामाचं श्रेय स्वत:कडे घेण्यासाठी सातत्यानं आटापिटा करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नवीन कामकाज पद्धतीची त्यात भर पडली आहे त्यामुळं काही सदस्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामकाजपद्धतीबाबत पालकमंत्री पवार यांच्याकडे तक्रार केली अशी माहिती समोर आली आहे.

Related Posts