IMPIMP

Sachin Vaze : …बडा करना है !’ च्या नादात अडकले?

by pranjalishirish
sachin vaze case : mukesh ambani explosives case how sachin vaze stuck issue here details

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – 90 च्या दशकात 60 पेक्षा जास्त एन्काऊंटर करणाऱ्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा त्यावेळी भरपूर दबदबा होता. परंतु ख्वाजा युनुस प्रकरणात नाव समोर आल्यानंतर सचिन वाझे यांची प्रतिमा डागळली. 90 च्या दशकातला तोच दबदबा वाझे यांना पुन्हा करायचा होता.

खात्यात आल्यानंतर सचिन वाझे यांना सीआययु (CIU) या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली. हे खातं आयुक्तांच्या महत्त्वाच्या खात्यांपैकी एक आहे. खास बाब म्हणजे यात खात्यात महत्त्वाचे गुन्हे वर्ग करण्यात आल्यानं कधीही चर्चेत नसलेलं CIU पथक वाझेंमुळं चर्चेत आलं.

हृतिक रोशन फेक ईमेल आयडी, फेक इंस्टाग्राम फॉलोवर्स, टीआरपी, डीसी अवंतिका हे महत्त्वाचे गुन्हे सोपवण्यात आले होते. या सगळ्यामुळं सचिन वाझे चर्चेत आले मात्र अंबानीच्या धमकीच्या पत्रात कुछ तो बडा करना है असं वाक्य लिहिण्यात आलं होतं. यावरून पुन्हा चर्चेत येण्यासाठी सचिन वाझे यांनी हे कृत्य केलं अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोण आहेत सचिन वाझे ?

– 1990 मध्ये सचिन वाझे Sachin Vaze सब इंस्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात जॉईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.

– उपनिरीक्षक पदापासून कारकीर्दीची सुरुवात करणारे, गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरातून सेवेची सुरुवात करणारे सचिन वाझे ठाणे पोलीस दलात आपल्या कामामुळं प्रसिद्धीला आले.

– सचिन वाझेंसह Sachin Vaze 14 पोलीस कर्माचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्ट आरोपी ख्वाजा युनुसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.

– सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलीस फोर्सचा राजीनामा दिला.

– सचिन वाझे जवळपास 13 वर्षांनंतर 6 जून 2020 रोजी पुन्हा पोलीस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबईत पोलिसातून राजीनामा दिला होता.

– 30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.

– 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलीस फोर्समध्ये परतले होते.

– वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडाचां एन्काऊंटर केला आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.

– अलीकडेच रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts