IMPIMP

Reebok पासून वेगळे होण्याच्या तयारीत Adidas, जर्मन कंपनीने आपला फेमस शूज ब्रँड विकण्याची औपचारिक प्रक्रिया केली सुरू

by sikandershaikh
reebok-adidas

नवी दिल्ली : जर्मनीची स्पोर्टवेयर कंपनी अदिदास (adidas) आपला फेमस शूज ब्रँड रिबॉक (reebok-adidas) विकण्याच्या तयारीत आहे. या ब्रँडची कामगिरी मागील काही काळापासून ठिक चाललेली नाही. अदिदासने सांगितले की, त्यांनी रिबॉक विकण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. अदिदासने ग्रोथसाठी 5 वर्षांचा प्लॅन बनवला आहे, जो 10 मार्चला सादर केला जाईल. त्याच दिवशी कंपनी 2020 चे आपले निकाल सुद्धा जारी करेल. माहितीनुसार, कंपनी 2021 च्या पहिल्या तिमाहीपासून रिबॉकचे कामकाज बंद करेल. सीएनबीसीला एका बँकिंग सोर्सने सांगितले की, रिबॉकच्या बिझनेसची व्हॅल्यू 1.2 अरब डॉलरच्या बरोबरीने आहे.

गुंतवणुकदार सातत्याने करत होते विक्रीची मागणी

अदिदासचे चीफ एग्झिक्यूटिव्ह कास्पर रोरस्टेड यांनी म्हटले की, रिबॉक आणि अदिदास वेगळे होऊन चांगली ग्रोथ मिळवू शकतात. अदिदासने 2006 मध्ये बोस्टनच्या रिबॉकला 3.8 अरब डॉलरमध्ये खरेदी केले होते, परंतु याच्या कमजोर परफॉर्मन्समुळे इन्व्हेस्टर्स सातत्याने विकण्याची मागणी करत होते. या दरम्यान अदिदास अमेरिकेत आपल्या कोअर ब्रँडद्वारे नायकी (Nike) ची भागीदारी खरेदी करण्यात यशस्वी झाली. कंपनीने कान्य वेस्ट (Kanye West), बियॉन्से (Beyonce) आणि फरेल विलियम्स (Pharrell williams) सोबत भागीदारी केली, ज्यातून चांगला फायदा मिळाला आहे.

रोरस्टेड यांनी केला रिबॉकला रूळावर आणण्याचा प्रयत्न (reebok-adidas)

रोरस्टेड 2016 मध्ये जेव्हा कंपनीचे सीईओ बनले तेव्हा त्यांनी रिबॉकला (reebok) रूळावर आणण्यासाठी प्लॅन बनवला होता.
यातून रिबॉकची प्रॉफिटेबिलिटी सुद्धा वाढली, परंतु त्याची कामगिरी सातत्याने कमजोर राहिली. याचा परिणाम अदिदासवर (adidas) सुद्धा झाला.
या दरम्यान कोरोना व्हायरसच्या स्थितीने कंपनीचा व्यवसाय आणखी कमजोर केला होता.
2020 च्या तिसर्‍या तिमाहीत रिबॉकची निव्वळ विक्री 7 टक्के घसरून 40.30 कोटी यूरोवर आली होती.
यामुळे मागील तिमाहीत कंपनीची विक्री 44 टक्के घसरली होती.
अदिदासने 2019 मध्ये रिबॉकची बुक व्हॅल्यू 2018 च्या तुलनेत सुमारे अर्धी म्हणजे 84.20 कोटी केली होती.

Related Posts