IMPIMP

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

by nagesh
Anil Deshmukh | income tax department raided on anil deshmukh property in nagpur

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Anil Deshmukh | सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर असणारे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ईडी कारवाई विरोधात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. परंतु ED कारवाईविरोधात अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश देखील न्या. रेवती मोहिते-डेरे (Justice Revati Mohite-Dere) यांनी दिले आहेत. मुंबई हायकोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने आता त्यांचं प्रकरण दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ED समन्स रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हाय कोर्टाने नकार दिल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत अनेकवेळा ईडीने समन्स पाठवून देखील अनिल देशमुख (Anil Deshmukh) चौकशीसाठी हजर नव्हते. त्यांनी ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मात्र, सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने अनिल देशमुखांना ईडीच्या कारवाईपासून कुठलाही दिलासा नाही.

अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी (Dr. Gaurav Chaturvedi) यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI ) ताब्यात घेतलं आहे.
मात्र, अनिल देशमुखांच्या कुटुंबियांनी डॉ. चतुर्वेदी यांचं अपहरण झाल्याचा आरोप केला होता.
कुठलीही माहिती न देता या दोघांना ताब्यात घेतल्याचं कुटुंबियांचं म्हणणं होतं.
पण, आता गौरव चतुर्वेदींना CBI कडून सोडण्यात आलं आहे.
CBI कडून त्यांची 20 मिनिटे चौकशी झाली.
आवश्यकता वाटल्यास पुन्हा चौकशी करणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
तर, देशमुख यांचे वकिल आनंद बागा यांची मात्र चौकशी अजून सुरुय.

दरम्यान, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसलुचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप केला होता.
त्यानंतर अनिल देशमुखांची ED आणि CBI चौकशी केली जात आहे.

 

Web Title : Anil Deshmukh | bombay high court refused to hear the petition seeking cancellation of the ed summons of anil deshmukh

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोनं मिळतंय 10000 रुपये ‘स्वस्त’, गुंतवणुकीची चांगली संधी; पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

Ajit Pawar | ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने 500 कोटी निधी वितरित

Pune Crime | पुण्याच्या ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’मध्ये चंदनाच्या 10 झाडांची चोरी

 

Related Posts