IMPIMP

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांनी नाराजी

by sachinsitapure

मुंबई: Chhagan Bhujbal | प्रफुल पटेल (Praful Patel) यांची राज्यसभेची (Rajya Sabha) जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांची वर्णी लागू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसने अजून अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवाव असं राष्ट्रवादीमधल्या एका गटाचे मत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पराभव केला होता.

भविष्यातील बारामतीच राजकारण लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवाव असं पक्षात एक मतप्रवाह आहे. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन छगन भुजबळ नाराज आहेत. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणं छगन भुजबळ यांना फारस पटलेलं नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज दुपारी दीड वाजता सुनिता पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार (Parth Pawar), आनंद परांजपे (Anand Paranjpe) , बाबा सिद्दिकी (Baba Siddique) इच्छुक होते.

राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ऐनवेळी उमेदवारी घोषित केला जात असेल तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आला आहे, मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा प्रश्नही छगन भुजबळांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना विचारला असल्याची माहिती आहे.

Related Posts