IMPIMP

Coronavirus : खुशखबर ! 1 मार्चपासून सर्वसामान्यांचं लसीकरण; ‘या’ लोकांना मोफत मिळणार ‘कोरोना’ लस

by sikandershaikh
Coronavirus

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)कोरोना लसीसाठीची (COVID-19 Vaccine) सर्वसामान्यांची प्रतिक्षा आता अखेर संपली आहे. आता 1 मार्च 2021 पासून सर्वसामान्यांना कोरोना (Coronavirus) लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. जावडेकरांनी हेही सांगितलं आहे की, काही जणांना ही लस मोफत दिली जाईल तर काहींना शुल्क आकारले जाईल.

प्रकाश जावडेकर म्हणाले, 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांना इतर आजार आहेत, त्यांचं लसीकरण केलं जाणार आहे. सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयात हे लसीकरण (COVID-19 Vaccine) केलं जाईल. यात 10 हजार सरकारी केंद्रांचा आणि 20 हजार खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

पुढं बोलताना ते म्हणाले, ज्यांना सरकारी केंद्रावर लस दिली जाणार आहे, त्यांना ती मोफत मिळणार आहे. तर खासगी रुग्णालयात केल्या जाणाऱ्या लसीकरणासाठी शुल्क आकारले जाणार आहे. कोरोना (Coronavirus) लशीसाठी किती पैसे घेतले जातील याबाबत आरोग्य विभाग दोन तीन दिवसात घोषणा करेल असंही जावडेकरांनी नमूद केलं.

देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहिम सुरू झाली आहे.
सध्या आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली जात आहे.
23 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 1.19 कोटी पेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

23 फेब्रुवारीच्य दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एका दिवसात 1.61 लाख लोकांना कोरोना लस दिली गेली.
त्यापैकी 63,458 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लशीचा दुसरा डोस घेतला.
महाराष्ट्रात 9,29,848 जणांनी पहिला तर 73,858 जणांनी दुसरा डोस घेतला म्हणजेच एकूण 10,03,706 लोकांनी लस घेतली.

जबरदस्त ! 15 वर्षीय मुलाने केली कमाल, WhatsApp च्या तोडीचं बनवलं भारतीय App

Related Posts