IMPIMP

Maharashtra MLC Elections 2022 | उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंचा सवाल; म्हणाले – ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’

by nagesh
Vinayak Mete | what happened in two hours after accident this should be investigated demand of jyoti mete wife of vinayak mete

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra MLC Elections 2022 | राज्यसभेनंतर विधान परीषदेच्या निवडणुकीवरुनही (Maharashtra MLC Elections 2022) राज्यात वातावरण तंग झालं आहे. अशातच आज (बुधवारी) भाजपने (BJP) विधान परिषदेसाठी पाच नावांची घोषणा केली आहे. त्यानंतर आता नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर ते नाराज आहेत. ‘भाजपने आम्हाला काय फक्त वापरुन घेतलं का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भाजपकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), चित्रा वाघ (Chitra Wagh), शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे तसेच रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे काही नेत्यात नाराजींचा सूर उमटत आहे.

 

अशातच विनायक मेटेंनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं काय?’ असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपच्या यादीमध्ये त्यांचे 2014 पासून मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे नाव नाही.
भाजपच्या सत्तेच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधीही मिळाली नव्हती.
त्याचबरोबर इतर निवडणुकीतही त्यांना वाटा मिळाल्या नसल्याची तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांनी या आधीही करण्यात आली होती.
दरम्यान फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर होईल का? हे पाहावे लागेल.

 

Web Title :- Maharashtra MLC Elections 2022 | maharashtra mlc elections 2022 shivsangram vinayak mete on bjp candidate list maharashtra marathi news

 

हे देखील वाचा :

Modi Cabinet Decision On MSP | मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट ! खरीप पिकासाठीच्या MSP च्या वाढीस मंजुरी

Pankaja Munde | ‘पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं’ ! विधानपरिषदेसाठी भाजपने पत्ता कट केल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून आमंत्रण

Aam Aadmi Party Pune | शहरातील नगरसेवकांचे सौजन्य व संकल्पनेचे बोर्ड महापालिकेने काढून टाकावेत; – ‘आप’ची मागणी

 

Related Posts