IMPIMP

MNS-BJP-Mahayuti | महायुतीत चौथा वाटेकरी, मनसेने महायुतीकडे ‘या’ 20 जागा मागितल्या? ; जाणून घ्या

by sachinsitapure

मुंबई: MNS-BJP-Mahayuti | लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभा निवडणुकीसाठी मनसनेने महायुतीकडे जागांची मागणी केली आहे. मनसेने महायुतीकडे २० जागा मागितल्या आहेत.

त्यामध्ये वरळी, दादर, माहिम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर मध्य आणि पुण्यतील एका जागेचा समावेश असल्याची माहिती आहे.

वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. तर दादरमधून नितीन सरदेसाई आणि वर्सोवातून शालिनी ठाकरे इच्छुक आहेत अशी राजकीय वर्तुळात कुजबुज आहे.

मनसेकडून गेल्या २ लोकसभा निवडणुका लढवण्यात आल्या नाहीत. २००९ मध्ये मनसेला लोकसभा निवडणुकीत लाखो मते मिळाली होती. त्यानंतरच्या विधानसभेत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाचा आलेख सातत्याने घसरत गेला. त्यात मागील २०१९ आणि यंदाची २०२४ ची लोकसभा निवडणूक मनसेकडून लढवण्यात आली नाही. २०१४ आणि २०१९ या विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ १ जागेवर यश मिळालं.

Related Posts