IMPIMP

‘मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे…’ – अबू आझमी

by sikandershaikh
abu-azmi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) muslim leaders | विधानसभेत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केलं. यावरून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे महाविकास आघाडीमधील मुस्लिम नेत्यांवर (muslim leaders) भडकले आहेत. अबू आझमी आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

अबू आझमी म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले, तेव्हा सभागृहात उपस्थित मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती. बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मुस्लीम नेत्यांनी आतापर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे होता.

विधानसभेत बोलताना काल उद्धव ठाकरे म्हणाले होते की, बाबरी पाडली तेव्हा त्यांची जबाबदारी घेण्यास कोणी पुढे आले नाही. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे, त्यांचा गर्व आहे. बाळासाहेब जेव्हा हिंदुत्वासाठी उभे राहिले तेव्हा तुम्ही कोठे होता. आम्ही तेव्हाही हिंदू होतो अन् आजही हिंदूच आहोत.

“उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेचे नेते नाही तर राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी असं बोलायला नको होते.
त्याचे विधान खूप दुःखदायक आहे,” असे आझमी यांनी सांगितले.
अबू आझमी यांच्या या विधानानंतर आता महाविकास आघाडीतील नेते काय भूमिका घेणार, हे लवकरच कळेल.

Related Posts