IMPIMP

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मालमत्तेवर ‘टाच’?

by nagesh
Parambir Singh | can suspension of former mumbai police commissioner parambir singh may be revoked

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंग हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. ते कोठे गेले आहेत हे खुद्द तपास यंत्रणांनासुद्धा माहीत नसल्याचे समोर आले होते. त्यांच्या विरोधात ठाणे, मुंबई गुन्हे शाखेकडे काही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सिंग (Parambir Singh) यांच्याविरोधात अदखलपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याचबरोबर आता या महिन्यापासून त्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. दरम्यान, सिंग (Parambir Singh) यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे तपास अधिकारी रमेश महाले (Ramesh Mahale) यांनी सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

परमबीर सिंग हे नेपाळला गेल्याचा दावा करण्यात येत होता.दरम्यानच्या काळात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नेपाळमार्गे परमबीर सिंग बेल्जिअमला
गेल्याचा दावा केला. त्या संदर्भात बोलताना महाले म्हणाले की, निरुपम यांनी केलेला दावा खरा असेल तर सिंग यांच्या बेल्जिअम येथील पत्त्यावर नोटीस
पाठवली जाऊ शकते. या पूर्वी अशा नोटीस पाठवल्या आहेत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ५ आरोपींना पाकिस्तानच्या पत्त्यावर नोटीस पाठवली
होती. इंटरपोलच्या माध्यमातून ही नोटीस पाठवण्यात आली. परंतु पाकने आम्हाला काहीच मदत केली नाही. दाऊद, राजन यांनाही परदेशात वॉरंट
पाठवलं होतं, असंही महाले यांनी सांगितले.

सीबीआय (CBI) ही भारताची नोडल एजन्सी म्हणून इंटरपोलचे (Interpol) काम करते. सिंग (Parambir Singh) यांच्या बेल्जिअमच्या पत्यावर नोटीस पाठवायची झाल्यास महाराष्ट्र पोलीस सिंग यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपावतील. त्यामध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधातील एफआयआर आणि कोर्टाची अदखलपात्र वॉरंटचा समावेश असेल. त्यानंतर सीबीआयला कागदपत्रे सोपवल्यानंतर त्याचे बेल्जिअमच्या मूळ भाषेत अनुवाद करण्यात येईल. त्यानंतर ही कागदपत्रे सरकारकडून त्याठिकाणच्या पोलिसांना पाठवण्यात येतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 मालमत्ता जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया

सीआरपीसी कलम ८१,८२ नुसार एखाद्या गुन्ह्यातील आरोपी सापडत नसेल तर त्यावेळी त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते. यासाठी काही कायदेशीर प्रकिया पार पाडावी लागते. त्यामध्ये आरोपीच्या घरावर पोलीस वॉरंट चिटकवतील. दरम्यान, परमबीर सिंग यांच्याकडे अनेक घरं आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पत्त्यावर वॉरंट कॉपी पाठवली जाईल. त्याठिकाणी दरवाज्यावर ती लावण्यात येईल. तद्नंतर यासर्वाचा पोलीस पंचनामा करतील. परमबीर सिंग हे मोठे प्रस्थ असल्याने त्यांच्या विरोधातील कारवाईची बातमी टीव्ही, ऑनलाईन आणि प्रिंट मीडियातही येईल. त्यामुळे ते कोठेही असले तरी त्यांना ही बातमी समजली आहे असे मानण्यात येईल. निर्धारित तारखेनंतर महाराष्ट्र पोलीस सिंग यांच्या मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल करतील.

 

Web Title: Parambir Singh | former mumbai police commissioner parambir singh property might be seized police

 

हे देखील वाचा :

WhatsApp ने बंद केली 22 लाखापेक्षा जास्त अकाऊंट, यूजर्सने कधीही करू नयेत ‘या’ चूका; जाणून घ्या

Pune Crime | ‘मै इधरका भाई, मलंग भाई’ ! तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | ‘पती’नं मारहाण केल्याने पत्नीच्या कानाचा पडदा फाटून झाली ‘इजा’

 

Related Posts