IMPIMP

WhatsApp ने बंद केली 22 लाखापेक्षा जास्त अकाऊंट, यूजर्सने कधीही करू नयेत ‘या’ चूका; जाणून घ्या

by nagesh
Hide WhatsApp Typing Status | how to hide whatsapp typing status from contacts no one will see when you typing or online

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र, यावेळेस कोणत्याही नवीन फीचर किंवा नियमामुळे नव्हे, तर आपल्या एका निर्णयामुळे चर्चेत आहे. WhatsApp ने 22 लाखापेक्षा जास्त व्हॉट्सअप अकाऊंट बॅन केली आहेत. याबाबतचा खुलासा कंपनीच्या मासिक रिपोर्टमध्ये झाला आहे. जी व्हॉट्सअप अकाऊंट बॅन केली आहेत, त्यांनी नियमांचे उल्लंघन केले होते. याबाबतचे नियम आणि अशाप्रकारचा बॅन टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एकुण अकाऊंटची संख्या 22 लाख 9 हजार

 

WhatsApp ने आपल्या यूजर्सची सेफ्टी आणि सिक्युरिटी लक्षात घेऊन त्या यूजर्सला बॅन केले आहे ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले होते.
व्हॉट्सअपच्या यूजर सेफ्टी रिपोर्टवरून समजले की, बॅन केलेल्या एकुण अकाऊंटची संख्या 22 लाख 9 हजार आहे.

 

यूजर्सच्या तक्रारीवर सुद्धा होतेय कारवाई

 

WhatsApp ने म्हटले की, या यूजर सेफ्टी रिपोर्टमध्ये यूजर्सकडून मिळालेल्या तक्रारी आणि त्यावर करण्यात आलेल्या कारवाईसह प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी व्हॉट्सअपद्वारे करण्यात आलेल्या कारवाईचा समावेश आहे.

 

560 यूजर जनरेटेड तक्रारी

 

WhatsApp ने सरकारला सांगितले की, सप्टेंबरमध्ये त्यांना अकाऊंट सपोर्ट, बॅन अपील, इतर सपोर्ट आणि प्रॉडक्ट सपोर्ट, सेफ्टी कॅटेगरीत 560 यूजर जनरेटेड तक्रारी मिळाल्या होत्या.
या रिपोर्टच्या डिटेल्स अशाप्रकारे : अकाऊंट सपोर्ट (121), बॅन अपील (309), अन्य सपोर्ट आणि प्रॉडक्ट सपोर्ट (49 प्रत्येक) आणि सेफ्टी (32).

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेक्नोलॉजीचा वापर

 

कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले, व्हॉट्सअप एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस देणारे आणि मेसेजिंग दुरुपयोग रोखणारे लीडिंग अ‍ॅप आहे.
मागील काही वर्षात आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर यूजर्सला सुरक्षित ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरी टेक्नोलॉजी, डेटा तंत्रज्ञानात सातत्याने गुंतवणूक केली आहे.

 

असे ठेवा अकाऊंट सुरक्षित

 

  1. जर कुणी बेकायदेशी, अश्लील, मानहानी संबंधी, धमकावणे, घाबरवणे, त्रास देणे आणि द्वेष पसरवणारा आणि वांशिक किंवा जातीय भेदभाव पसरवणारा किंवा बेकायदेशीर वर्तनासाठी उद्यूक्त करणारा मजकूर शेयर केले तर त्याचे अकाऊंट बॅन केले जाते.
  2. याशिवाय जर कुणी यूजर व्हॉट्सअपच्या टर्म्स अँड कंडीशनचे उल्लंघन करत असेल तरी सुद्धा त्याचे अकाऊंट होते.
  3. यामुळे असा कंटेंट कुणासोबतही शेयर करू नका. तरच तुमचे अकाऊंट सुरक्षित राहील.

 

Web Title : WhatsApp | whatsapp big action banned more than 20 lakh accounts keep your account safe in this way

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘मै इधरका भाई, मलंग भाई’ ! तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | ‘पती’नं मारहाण केल्याने पत्नीच्या कानाचा पडदा फाटून झाली ‘इजा’

Kirit Somaiya | अजित पवारांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा घणाघाती आरोप

 

Related Posts