IMPIMP

Shivsena MLA Mangesh Kudalkar | शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

by nagesh
Shivsena MLA Mangesh Kudalkar | shiv sena mla mangesh kudalkar wife Rajni Kudalkar commits suicide

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर (Shivsena MLA Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीने आत्महत्या केली (Commits Suicide) आहे. रजनी कुडाळकर Rajni Kudalkar (वय – 42) असे त्यांचे नाव आहे. मुंबईतील कुर्ला येथील नेहरु नगर (Nehru Nagar Kurla) येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे (Kurla Assembly Constituency) प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या पत्नीने राहत्या घरी रविवारी (दि.17) गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली. (Shivsena MLA Mangesh Kudalkar Wife Commits Suicide)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवसेना आमदार मंगेश कुडालकर यांचे कुटुंब कुर्ल्यातील नेहरु नगर पोलीस ठाण्याच्या (Nehru Nagar Police Station) हद्दीत राहते. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास रजनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नेहरु नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कुडाळकर यांच्या घरी पोहचले त्यावेळी त्यांना रजनी यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला.

 

 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) पाठवला. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिक कुडाळकर यांच्या घराबाहेर जमा झाले. दरम्यान, रजनी कुडाळकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांना मुलाच्या निधनाचा धक्का बसला होता. अशी माहिती मिळत आहे.

 

Web Title :-  Shivsena MLA Mangesh Kudalkar | shiv sena mla mangesh kudalkar wife Rajni Kudalkar commits suicide

 

हे देखील वाचा :

Traffic Diversion On Shivaji Road Pune | अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त शिवाजी रोडवरील वाहतूकीत बदल

Mutual Funds | पैसे सर्वात वेगाने वाढवणारे ‘हे’ आहेत टॉप 5 फंड

Pune Crime | ‘इतना खर्चा होता है, हमे कुछ पैसा कमाना होगा’ ! पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची व तलाक देण्याची दिली धमकी

Gold Silver Price Today | लग्नसराईच्या हंगामात सोन्या – चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या लेटेस्ट दर

 

Related Posts