IMPIMP

‘या’ मॉडेलमुळं मोडला होता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा 13 वर्षांचा संसार ! वाचून बसेल धक्का

by sikandershaikh
saif-ali-khan-and-amrita-sing

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) बॉलिवूड स्टार सैफ अली खान (saif ali khan) आणि त्याची एक्स वाईफ ॲक्ट्रेस अमृता सिंह यांनी कुटुंबाचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. सैफ तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होता. 80 च्या दशकातील या फेमस ॲक्ट्रेसची आणि सैफच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. अमृतानं 1991 साली सैफ अली खान सोबत लग्न केलं. 2004 मध्ये दोघं वेगळे झाले. तुम्हाला माहित आहे का हे दोघं वेगळे होण्यामागे एक इटालियन मॉडेल कारणीभूत ठरली होती.

मीडिया रिपोर्टनुसार सैफनं अमृताला चीट करत इटालियन मॉडेल रोजा कॅटलानो सोबत अफेअर केलं होतं. सैफचं रोजासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्यानं सैफ आणि अमृता यांचं लग्न तुटल्याचं बोललं जातं.

सैफ (saif ali khan ) आणि रोजा यांची भेट 2004 साली केन्यामध्ये झाली होती.
त्यावेळी सैफची मॅरिड लाईफ खूप नाजूक परिस्थितीतून जात होती.
त्यावेळी सैफ आणि अमृता यांच्यात खूप भांडणं होत होती. रोजाला भेटल्यानंतर सैफला रोजावर प्रेम झालं होतं.

सैफ आणि रोजा यांचं अफेअर अमृतापासून जास्त काळ लपलं नाही.
सैफ फसवतो आहे हे समजल्यानंतर तिला सैफ सोबत राहण्याची इच्छा नव्हती.
रोजामुळं सैफलाही अमृतापासून वेगळं व्हायचं होतं. 2004 साली सैफ आणि अमृता वेगळे झाले.

यानंतर रोजा सैफसाठी मुंबईत आली. परंतु सैफनं रोजालाही फसवलं होतं जे तिला मुंबईत आल्यावर समजलं.
एका मुलाखतीत रोजानं सांगितलं की, सैफनं तिच्यापासून पहिलं लग्न आणि मुलांबद्दल लपवलं होतं जे तिला भारतात आल्यानंतर कळालं.
दोघंही लिव्हइन रिलेशनमध्ये राहू लागले होते.
त्यावेळी सारा 10 वर्षांची होती आणि इब्राहिम 4 वर्षांचा होता.

2004 साली अमृताला घटस्फोट दिल्यांतर सैफनं 2012 साली करीना कपूरसोबत लग्न केलं होतं.
नुकताच तो दुसऱ्यांदा करीनाच्या बाळाचा बाप झाला आहे.

पोलिसांनी महिलांना नाचवल्याच्या घटनेवर अनिल देशमुखांनी विधानसभेत दिलं स्पष्टीकरण ! म्हणाले- ‘समितीनं दिलेल्या अहवालानुसार…’

Related Posts