IMPIMP

Akola News : भरदिवसा युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून, परिसरात खळबळ

by amol
Crime

अकोला (Akola News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Akola News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून एका युवकाचा भरदिवसा चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठी उमरी भागातील राष्ट्रीय शाळेजवळ आज (गुरुवारी) दुपारी घडली.

गोपाल शिंदे (वय-25) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपींनी जुन्या वादावरुन गोपाल याचा खून केल्याची माहिती समोर येत असून घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल आणि आरोपी यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याचा राग मनात धरुन आरोपींनी गोपालला आज दुपारी राष्ट्रीय शाळेजवळ बोलावले होते. यावेळी आरोपींनी गोपालवर चाकू व दगड विटांनी हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गोपालचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related Posts